सोलापूर येथील आंतरराष्ट्रीय रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकरचे यश
schedule22 Dec 25 person by visibility 107 categoryक्रीडा
कोल्हापूर : सोलापूर येथे रविवार २१ डिसेंबर रोजी चैत्राली लॉन राजश्री नगर सोलापूर येथे झालेल्या फिडे रॅपिड रेटिंग रायसोनी चषक बुद्धिबळ स्पर्धा २०२५ या स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकर याने ९ व्या फेरीत ८ गुण मिळवून पहिला क्रमांक घेत १५००० रुपये आणि चषक फिडे रॅपिड रेटिंगमध्ये 47 गुणांनी वाढ झाली.
बुद्धिबळ स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आल्या होत्या. IM संजीत पाल पश्चिम बंगाल हा साडे आठ गुण मिळवून अजिंक्य ठरला त्याला 31 हजार रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेमध्ये एकूण २००००० रुपयाची पारितोषिके होती. देशातील १ IM व २९२खेळाडूनी भाग घेतला त्या मध्ये ९४ फिडे मानांकित खेळाडू होते.
ऋषिकेश हा अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे सराव करतो. तो स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.





