अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे ‘केआयटी’ला प्रथम प्राधान्य; अभियांत्रिकी शिक्षणात कौशल्याधारित बदल अभ्यासक्रमात केल्याचे फळ
schedule26 Jul 23 person by visibility 2450 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रवेश यादी कालच घोषित झाली. कोल्हापूरातील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सर्व विभागांना जिल्ह्यातील,परजिल्ह्यातील तसेच परराज्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी पसंती दिलेली आहे. आज २६ जुलै २०२३ रोजी प्रवेशाची पहिली फेरी सुरू झाली असून पालक व विद्यार्थ्यांच्यात केआयटीत प्रवेश मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
संस्थेत प्रथम प्रवेश घेतलेल्या अथर्व माळी या विद्यार्थ्याचे व कु.आदिती देसावळे या विद्यार्थिनीचे रजिस्ट्रार डॉ.मनोज मुजुमदार डॉ.व्ही.व्ही.कर्जिन्नी, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.याप्रसंगी डॉ.डी.जे.साठे,मध्यवर्ती प्रवेश प्रक्रियेचे समन्वयक डॉ.महेश शिंदे, सह-समन्वयक डॉ.सौरभ जोशी, प्रा.अमर टिकोळे व प्रवेश प्रक्रिया समितीतील अन्य सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
केआयटीची ४० वर्षाची शैक्षणिक परंपरा व शैक्षणिक दर्जा यांचा मान ठेवत प्रवेशासाठी साजेसा प्रतिसाद दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी,उपाध्यक्ष साजिद हुदली,सचिव दीपक चौगुले यांनी पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले आहेत.