कोल्हापूर महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
schedule15 Aug 26 person by visibility 210 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8.15 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दिपा ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, प्राथमिक शिक्षण समिती उपसभापती सौ.पुजा पोवार, प्रभाग समिती सभापती संजय मोहिते, नगरसेविका पुर्वा राणे, अर्चना कोराणे, निलिमा पाटील व अधिकारी उपस्थित होते.
यानंतर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ बाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. यामध्ये मी सर्व महिलांना समानतेने, आदराने आणि संवेदनशीलतेने वागवण्याची आणि माझ्या सहाकाऱ्यांनाही याच भावनेने आणि कटिबध्दतेने काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रतिज्ञा करतो. मी पॉश कायदा, पॉश धोरण आणि शी-बॉक्स पोर्टल बाबत जागरुकता निर्माण करण्याची आणि त्यांचे पूर्ण प्रमाणिकपणे व निष्ठापूर्वक पालण करण्याची प्रतिज्ञा करतो. मी एक सुसंवादी, सन्माननीय आणि आदरयुक्त कार्यक्षत्र तयार करण्यासाठी आणि ते अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने सकारात्मक आणि निरंतर प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करतो अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.
महापौर रुपाराणी निकम यांनी सर्व अधिकाऱ्यांना पेनचा बॉक्स वाटप करुन सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना जिलेबी व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी महापौर रुपाराणी निकम यांनी सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्व विभागातील कर्मचा-यांनी नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचे आवाहन केले. तसेच देश स्वातंत्र्य करण्यासाठी खूप जवानांनी आपल्या प्राणांची आहूती दिली म्हणून आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. महापालिकेच्या आयुक्तांच्या नियंत्रणाखाली खूप चांगल काम सध्या सुरु आहे. आरोग्य सफाई कर्मचारी जेव्हा नागरीक उठण्यापुर्वी आपल्या कामाला सुरवात करतात. सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय आंम्ही सर्व नगरसेवक काहीच करु शकत नाही. त्यामुळे आपल्याला फक्त कोल्हापूरचे नांव संपूर्ण भारतामध्ये आदराने घ्यावे असे आपल्याला काम करायचे आहे.
यावेळी उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, कामगार अधिकारी राम काटकर, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, पदमल पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पवार, अरुणकुमार गवळी, मिलिंद जाधव, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्रांबरे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थी -विद्यार्थींनी, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.