४५ हजार रुपयांची लाच घेताना कोल्हापुरातील अन्न सुरक्षा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
schedule20 Aug 24 person by visibility 488 categoryगुन्हे
कोल्हापूर : वेफर्स उत्पादकावरील कारवाई टाळण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच घेताना अन्न औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनवणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले ही कारवाई आज मंगळवारी करण्यात आली.
तक्रारदार यांचे वेफर्स आणि नमकीन या खाद्यपदार्थांचे फर्म असुन सदर फर्म वरती अन्न औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनवणे (रा. A - 102, लाईफ स्टाईल अपार्टमेंट, प्रतिभानगर, कोल्हापूर . मुळ रा. राशीन, ता.कर्जत, जि. अहमदनगर) हे दिनांक 5 ऑगस्ट रोजी येऊन तपासणीकरिता सोनवणे यांनी तक्रारदार यांचे फर्म वरील सॅम्पल घेऊन गेले होते. त्यानंतर सोनवणे यांनी तक्रारदार यांना फर्म वरून घेऊन गेले सॅम्पल मध्ये कोणतीही कारवाई न करणेसाठी तसेच फर्म चे लायसन रद्द न करणेसाठी तक्रारदाराकडे 45,000/-₹ लाचेची मागणी केली. त्यानंतर सापळा कारवाई मध्ये सोनवणे यांनी तक्रारदार यांचेकडुन 45,000/-रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले . आरोपी यांचेविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बापु साळुंके , स.पो.फौ.प्रकाश भंडारे, पो.हे.कॉ. विकास माने, पो.हे.कॉ. सुनील घोसाळकर,
पो.ना.सुधीर पाटील, म.पो.ना.संगीता गावडे, पो.ना.सचिन पाटील ला.प्र.वि.कोल्हापूर यांनी केली.