SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

कोल्हापूर: एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या महिला चोरट्यास पुण्यातून अटक; पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

schedule31 May 26 person by visibility 274 categoryगुन्हे

कोल्हापूर : येथील सी.बी.एस. एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र चोरणाऱ्या महिला चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
 
 दि. २४ मे २०२६ रोजी एसटी बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलांचे दागिने चोरले होते. या घटनेनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या पथकाने तांत्रिक तपास करत पुण्यातून सविस्तर तपास करून सविता गोविंद अवताडे (वय ४०, रा. सिंहगड रोड, पुणे) या महिलेला ताब्यात घेतले. तिने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली असून, तिच्याकडून एकूण २ लाख ८९ हजार ८०० रुपये किमतीची २७.५४० ग्रॅम वजनाची सोन्याची दोन मंगळसूत्र जप्त करण्यात आली आहेत. या यशस्वी कारवाईमुळे कोल्हापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes