SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अमृतच्या माध्यमातून उद्योजकांसाठी भव्य प्रदर्शन व विक्रीमहसुली दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडकोरे अभियांत्रिकीत अंतर्गत हॅकाथॉन स्पर्धा उत्साहातइतिहासातील गायब झालेले ११ दिवस...जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय पुण्याला हलवू नये; सतेज पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे मागणीगोकुळ शिरगांव एमआयडीसीत कंपनीतून कार्बाइड इन्सर्ट व घरफोडीचा माल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंदकोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई!कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रारंभकोरे आर्किटेक्चर व शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेविट कार्यशाळा संपन्नडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार

जाहिरात

 

अमृतच्या माध्यमातून उद्योजकांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री

schedule02 Sep 26 person by visibility 45 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्यावतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ५ व ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत नागाळा पार्क येथील हॉटेल पाटीलवाडा जवळील श्री बाळकृष्ण हवेली ट्रस्ट सांस्कृतिक हॉल, केशवभाई पटेल यात्रेनिवास बिल्डिंग पार्किंग एरिया येथे होणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून छोट्या व घरगुती पद्धतीने उत्पादने निर्माण करणाऱ्या तसेच उत्पादनांची विक्री करणाऱ्या उद्योजकांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात उद्योजकांना विक्री स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांच्या व्यवसायाची प्रसिद्धी होण्यासोबतच उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. 

‘अमृत’च्या या उपक्रमाला भेट देऊन उद्योजक, नागरिकांनी उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे तसेच उद्योजकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाला नवी ओळख व प्रसिद्धी मिळवून द्यावी, असे आवाहन अमृततर्फे करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes