वारणा दूध संघामार्फत तात्यासाहेब कोरे यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त ६ नोव्हेंबरला जातिवंत जनावरांचे भव्य प्रदर्शन
schedule03 Nov 26 person by visibility 110 categoryउद्योग
◼️वारणा श्री म्हैस व वारणा श्री गाय पुरस्कासह भरगच्च बक्षिसे
वारणानगर : तात्यासाहेब कोरेनगर येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ व तात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय महाविद्यालय,वारणानगर यांचे तर्फे जातिवंत दुधाळ जनावरांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहीती वारणा समुहाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी दिली.
वारणा दूध संघामार्फत सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचे ११२ व्या जयंती निमित्त धनत्रयोदशी दिनांक ६ नोव्हेंबरला सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जातिवंत जनावरांचे प्रदर्शन होणार आहे.
यामध्ये म्हैस,रेडी,गायी, कालवड व रेडे असे जनावरांचे गट राहणार आहे म्हैस गटात वारणा श्री म्हैस पुरस्कारसाठी २५००१ रूपये व चषक आणि वारणा श्री गाय पुरस्कारसाठी २१००१ व चषक देण्यात येणार आहे म्हैस गटात प्रथम क्रमांकासाठी ८००१ रुपये, द्वितीयसाठी ७००१ रूपये, तृतीयसाठी ६५०१ रुपये, चतुर्थसाठी ६००१ रुपये व पाचव्या क्रमांकासाठी ५५०१ रुपये तसेच गाय गटात प्रथम क्रमांकासाठी ७००१ रुपये, द्वितीयसाठी ६००१ रुपये,तृतीयसाठी ५५०१ रुपये, चतुर्थसाठी ५००१ रूपये व पाचव्या क्रमांसाठी ४५०१ रुपये बक्षिसे देण्यात येणार आहेत यासह सहभागी झालेल्या जनावरांमधून निवड समितीने निवडलेल्या उत्कृष्ठ जनावरांना देखील २००१ रूपयांची उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवली आहेत.
शेतकरी दूध उत्पादकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे अध्यक्ष एच.आर. जाधव व कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी केले आहे.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष अँड एन.आर.पाटील,संकलन व पशुवैद्यकीय व्यवस्थापक डॉ.जे.बी.पाटील व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.