क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन
schedule11 Apr 26 person by visibility 109 categoryराज्य
कोल्हापूर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे बिंदू चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले .
यावेळेस स्वर्गीय बी.जी खराडे महाविद्यालयाच्या वतीने पालखीमध्ये विविध ग्रंथ ठेवून महात्मा फुले पुतळा ते राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ या मार्गावर मुलींची रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे जात पडताळणी संशोधन अधिकारी संभाजी पवार अधिक्षक सचिन पाटील , सामाजिक कार्यकर्ते गणी आजरेकर,आलोक जत्राटकर,विजय देवणे,डी जी भास्कर यांच्यासह समाज कल्याण विभागाचे इतर कर्मचारी तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .