गुजरात : वडोदरा येथे पूल कोसळला, अनेक वाहने नदीत पडली; आठ जणांचा मृत्यू
schedule09 Jul 25 person by visibility 330 categoryदेश

गुजरात : वडोदरा आणि आणंदला जोडणारा गंभीरा पूलही नदीत कोसळला. अपघाताच्या वेळी पुलावर अनेक वाहने होती, जी पुलासोबत नदीत वाहून गेली. पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरील ५ वाहने नदीत वाहून गेली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
वडोदरा आणि आणंदला जोडणाऱ्या महिसागर नदीवर गंभीरा पूल बांधण्यात आला होता. मात्र, आज सकाळी गंभीरा पूल अचानक तुटून नदीत पडला. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि ३ जणांचे प्राण वाचवले. मात्र, या अपघातात ८ जणांना आपला जीव गमवावा लागला.
पूल कोसळल्याने वडोदरा आणि आणंदमधील संपर्क तुटला आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी वाहतूक वळवली आहे.