SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल, तर शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत? आमदार सतेज पाटील यांची विचारणाजलजीवन मिशन योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी कोणती कारवाई केली? : आ. सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत सवालजोपर्यंत निर्णय होत नाहीत तोपर्यंत आमचं ठरलंय, हलायचं नाही : आमदार सतेज पाटील; विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना पाठिंबामहाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी : अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणेकोल्हापूर महानगरपालिका : सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये जन्म-मृत्यु दाखले मिळणार जैवतंत्रज्ञान विभागात नवीन स्ट्रेनचा शोध पदव्युत्तर विद्यार्थ्याच्या संशोधनाला यश५० लाख कुटुंबांना लाभ : राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची विधानसभेत घोषणामुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन संजय गायकवाड यांचे वर्तन अस्वीकार्य, कॅन्टीन कंत्राटदाराला मारहाण केल्याने मुख्यमंत्री फडणवीस संतापलेडी. वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ४१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

जाहिरात

 

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ यंत्रणा सज्ज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule09 Jul 25 person by visibility 181 categoryराज्य

▪️नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) सज्ज  आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात सभागृहात विषय मांडला होता.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरस्थितीमुळे काही प्रवासी एसटी बसमध्ये अडकले होते. त्यांना नजिकच्या शाळेत स्थलांतरित करण्यात येऊन सर्व प्रवाशांना सुखरूपपणे घरी पाठवण्यात आले आहे.

गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग बंद असून, पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे. गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गडचिरोलीपर्यंत सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर शहरातील सखल भागांत पाणी साचले असून यावर संबंधित यंत्रणा लक्ष ठेऊन आहे, बचावकार्य सुरू आहे. या पूरस्थितीत एक व्यक्ती वाहून गेल्याचीही माहिती मिळाली आहे. याठिकाणी एसडीआरएफ आणि एनडीआरएफ यांना सज्ज ठेवले आहे. आजही नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असे, आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes