SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि साखर कारखान्यांना केंद्राचे विशेष पॅकेज द्या; खासदार धनंजय महाडिक यांची अमित शहा यांच्याकडे मागणी१६ वर्षांचा संघर्ष मिटला; धनगर समाजाच्या एकीबद्दल आमदार यड्रावकर यांच्याकडून सन्मानराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरच्या 'केआयटी'चा डंका; आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार पटकावलेविद्यापीठाचे सुरक्षा रक्षक शिवाजी शिंदे यांना शोल्डर स्टारमाजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना राज्यपालांचे अभिवादनशिरोळ तालुक्यातील रस्ते विकासाला प्राधान्य : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरगोकुळ अध्यक्ष निवड वाद: चंद्रकांतदादांच्या समर्थनार्थ भाजपा-महायुती आक्रमक; विरोधकांचा पत्रकार परिषदेतून जोरदार समाचारबालदिन: भविष्याची कळी आणि उमलत्या फुलांचा उत्सव!कानठळ्या बसवणारी दिवाळी! कोल्हापूर शहर ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात!गोकुळच्या निवडणुकीत पात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा

जाहिरात

 

१६ वर्षांचा संघर्ष मिटला; धनगर समाजाच्या एकीबद्दल आमदार यड्रावकर यांच्याकडून सन्मान

schedule14 Nov 26 person by visibility 151 categoryसामाजिक

जयसिंगपूर : शिरोळ येथील धनगर समाजातील ५२ आणि ८० गटांमध्ये गेल्या तब्बल १६ वर्षांपासून सुरू असलेला अंतर्गत वाद अखेर सामंजस्याने मिटला. अनेक वर्षांचा दुरावा बाजूला ठेवून दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे. या ऐतिहासिक एकीचे स्वागत करत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या निवासस्थानी दोन्ही गटांतील समाजबांधवांचा सत्कार करून त्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मतभेदांमुळे समाजातील सामाजिक संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र, युवा पिढीने पुढाकार घेत ज्येष्ठ मंडळींशी संवाद साधला. परस्परांमधील मतभेद दूर करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर सर्वांच्या सामंजस्यातून १६ वर्षांचा संघर्ष संपुष्टात आला. एकाच समाजातील बांधव पुन्हा एकत्र आल्याने समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी समाजातील प्रमुखांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिरोळच्या धनगर समाजाच्या पाठीशी यड्रावकर कुटुंब नेहमीच उभे राहिले आहे. समाजाच्या प्रश्नांमध्ये आमदार यड्रावकर यांनी खंबीरपणे साथ दिली असून, यापुढेही त्यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळत राहील, अशी भावना समाजबांधवांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की, धनगर समाजातील दोन्ही गटांनी १६ वर्षांचा दुरावा संपवून एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. समाजाची एकी हीच समाजाच्या प्रगतीची ताकद आहे. सर्वांनी असेच संघटित राहून तालुक्याच्या आणि समाजाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करावे. तुमच्या प्रत्येक चांगल्या उपक्रमात आणि सामाजिक कार्यात मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes