कोल्हापुरातील पाचगावमध्ये कौटुंबिक, आर्थिक वादातून मोठ्या सख्ख्या भावाकडून धाकट्या भावाचा खून
schedule20 Aug 24 person by visibility 634 categoryगुन्हे
कोल्हापूर : कौटुंबिक आणि आर्थिक वादातून सख्ख्या भावाने धाकट्या भावाचा खून केल्याची घटना करवीर तालुक्यातील पाचगांवमध्ये घडली आहे. सागर जयसिंग कुंभार असे मृताचे नाव आहे.
पाचगाव मधील पवार कॉलनी मध्ये हे कुंभार कुटुंब राहते. दोन्ही भाऊ एकत्र असल्यामुळे त्यांच्यामध्ये कौटुंबिक आणि आर्थिक वादातून वरचेवर खटके उडत होते. आज मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास मोठा भाऊ वैभव जयसिंग कुंभार व लहान भाऊ सागर जयसिंग कुंभार यांच्यामध्ये वादावादी झाली. यातून मोठ्या भावाने वैभवला घरातून बाहेर काढून त्याच्या अंगावर मोटार सायकल ढकलली मोटरसायकल खाली अडकला यावे वैभवने मोटरसायकलचे चीन कव्हर काढून सागर याच्या चेहऱ्यावर व डोक्यात वर्मी घाव घातले. यामध्ये सागरचा जागीच मृत्यू झाला.
या खुनाची घटना समजताच करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच भागातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.