SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार : मंत्री हसन मुश्रीफशाहू मार्केट यार्ड ते रेल्वे महामार्गावर पथदिवे बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन; 'भारतीय दलित महासंघा'चा कोल्हापूर मनपा प्रशासनाला इशाराशासकीय निकष पाळून बकरी ईद साजरी करण्यात यावी : जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडफलोत्पादन अभियानांतर्गत 131 शेतकऱ्यांना 60 लाखांचे अनुदान मंजूर'सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना'पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी : मंत्री छगन भुजबळकोल्हापुरात दोन दुचाकी चोरांसह एका अल्पवयीन मुलाला अटक; २.२५ लाखांच्या ४ गाड्या जप्त'चालुक्याज क्रीडा महोत्सव २०२६': बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा कोल्हापुरात दिमाखदार शुभारंभ!डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड'ने सन्मान; उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरवघोडावत विद्यापीठात होणार जागतिक दर्जाचे डिझाईन स्कूल हॅमस्टेक कॉलेज सोबत सामंजस्य करार; डिझायनर नीता लुल्ला यांची उपस्थिती

जाहिरात

 

शाहू मार्केट यार्ड ते रेल्वे महामार्गावर पथदिवे बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन; 'भारतीय दलित महासंघा'चा कोल्हापूर मनपा प्रशासनाला इशारा

schedule22 May 26 person by visibility 69 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : मुक्त सैनिक गार्डन, शाहू मार्केट यार्ड प्रवेशद्वार ते रेल्वे महामार्ग दरम्यानचे पथदिवे गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने नागरिक, प्रवासी, महिला आणि कामगारांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या अंधाराचा गैरफायदा घेऊन या परिसरात गुन्हेगारी आणि अनैतिक प्रकार वाढले असून, येथे तात्काळ पथदिवे बसवावेत, अशी मागणी 'भारतीय दलित महासंघ' कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने मनपा आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महासंघाने दिला आहे.

भारतीय दलित महासंघाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष  सुरज शिवाजी अवघडे व इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला सादर करण्यात आले. 

या निवेदनात म्हटले आहे की, शाहू मार्केट यार्ड परिसरात विविध भागांतून महिला आणि पुरुष वर्ग रोजगारासाठी व विविध कामांसाठी येत असतात. मात्र, संध्याकाळी घरी परतत असताना या रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा सर्व प्रकार महानगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे घडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
रस्त्यावर अंधार असल्याचा फायदा घेऊन गुन्हेगार आणि व्यसनी लोक या ठिकाणी दारू पिऊन बसलेले असतात. तसेच रस्त्याच्या बाजूला दारूच्या बाटल्यांचे ढीग साचले असून, चारचाकी गाड्यांमध्ये अश्लील चाळे चालत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या असुरक्षित वातावरणामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या कामगार आणि महिला वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अंधाराचा गैरफायदा घेऊन भविष्यात कोणतीही मोठी अनुचित घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या गंभीर समस्येची दखल घेऊन महानगरपालिका प्रशासनाने मुक्त सैनिक गार्डन ते रेल्वे महामार्ग दरम्यान तात्काळ नवीन पथदिवे बसवावेत. जर प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि भविष्यात येथे कोणताही अनुचित प्रकार घडला, तर त्याला पूर्णपणे मनपा प्रशासन जबाबदार राहील, असे सांगत महासंघाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा पोलीस प्रमुख (कोल्हापूर) आणि शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.

 या निवेदनावर सुरज अवघडे, संदिप यादव, कुणाल डोणे, दिगंबर चौगुले, सोमनाथ कुरणे, आयान कुलकर्णी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes