SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणकोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिकथकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सीलसेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजन

जाहिरात

 

मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती शीतल तेली-उगले यांच्याकडून शहरातील मतदान केंद्रांची पाहणी

schedule15 Jan 26 person by visibility 240 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्त तथा मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले आणि प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज शहरातील विविध मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीदरम्यान शीतल तेली-उगले यांनी के. मंजूलक्ष्मी यांच्यासमवेत ताराबाई पार्क येथील जीएसटी कार्यालयातील पिंक मतदान केंद्रास, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, छत्रपती शाहाजी महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज, गोखले कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल, आय.टी.आय., सायबर कॉलेज येथील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी मतदान प्रक्रियेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता सुरेश पाटील उपस्थित होते.

त्याचप्रमाणे सोलापूर येथील अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निऱ्हाळी यांनीही शहरातील ताराराणी विद्यापीठ, सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर, लक्ष्मीबाई जरग शाळा, शिलादेवी शिंदे सरकार हायस्कूल, तपोवन शाळा व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथील मतदान केंद्रांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, कनिष्ठ अभियंता अवधूत नेर्लेकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes