आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांची हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील कामांची पाहणी
schedule26 Apr 26 person by visibility 38 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी 7.30 वाजता हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
प्रथम आयुक्तांनी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील टर्फची पाहणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले. तसेच हॉकी स्टेडियम परिसरातील गाळे दुरुस्त करून सुस्थितीत ठेवावेत व ते लिलाव पद्धतीने भाड्याने देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसर यांना दिल्या. परिसरातील स्वच्छता राखावी तसेच झाडांच्या फांद्या छाटण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.स्वाती दुधाने, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, इस्टेट ऑफिसर सतीश साळोखे, सहा.अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, प्रमोद बराले आदी उपस्थित होते.
यानंतर त्यांनी गांधीनगरमधील महापालिकेच्या हद्दीतील चालू असलेल्या मिळकतींचा सर्व्हेची जागेवर पाहणी करुन माहिती घेतली. आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी सर्व्हेचे काम पूर्ण झाल्यानंतर ॲनलेसेचे काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये महापालिका क्षेत्रात किती बांधकामे आहेत, याचे क्षेत्रफळ किती आहे. यामध्ये किती बांधकामे रिजर्व्हेशनमध्ये आहेत व किती ब्यु लाईन मध्ये आहेत याची सविस्तर माहिती सोमवारी देण्याचे आदेश उपशहर रचनाकार एन.एस.पाटील व त्यांच्या पथकास दिले. यावेळी उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता निवास पोवार, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लवाड, परवाना अधिक्षक अशोक यादव, पाच थकातील कनिष्ठ अभियंता व कर्मचारी उपस्थित होते
.
शेवटी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी कसबा बावडा येथील 76 एम एल डी, 4 एलएलडी व अमृत-2 मधील 15 एलएलडीच्या चालू असलेल्या नविन कामाची माहिती घेतली. अमृत-2 मधील 15 एलएलडीचे चालू असलेले काम जलद गतीने व दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये जी कामे राहिलेले आहेत ते सुस्थितीत करा. तसेच एसटीपी प्लॅन्ट रेग्युलर व सुस्थितीत ठेवण्याचे आदेश जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना दिले.
यावेळी उप-आयुक्त परितोष कंकाळ, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, सहा.अभियंता सुरेश पाटील, कन्संलटंट सुहास पाटील, प्रसाद पाटील, सागर दळवी, सह्याद्रीचे समीर देसाई उपस्थित होते.