SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चित्रनगरीसंदर्भात कोल्हापुरात चर्चासत्रकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : संस्कृती आणि परंपरांचा उत्सव : जिल्हाधिकारी अमोल येडगेधर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सुधारणावाद हेच भारतीय संविधानाचे तत्वज्ञान: डॉ. टी. एस. पाटीलपंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम नगररचना विभागाकडून आयोजित विशेष कॅम्पमध्ये 64 प्रकरणे मंजूरस्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आयोजित शिबिराचा 250 लाभार्थ्यांनी घेतला लाभकोल्हापूर महानगरपालिका प्रारुप प्रभाग रचनेवरील प्राप्त हरकतींची शुक्रवारी सुनावणीवसतिगृह प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढसंभापूर औद्योगिक वसाहत येथे प्राथमिक सुविधा उपलब्ध असल्याने असल्याने उद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे : संस्थेच्या अध्यक्षा, माजी आमदार जयश्री जाधव यांचे आवाहनभागीरथी संस्थेच्यावतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचे जल्लोषात झाले बक्षिस वितरण, बोरगाव इथल्या बोरजाई महिला संघाने पटकावले अजिंक्यपद

जाहिरात

 

भागीरथी संस्थेच्यावतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचे जल्लोषात झाले बक्षिस वितरण, बोरगाव इथल्या बोरजाई महिला संघाने पटकावले अजिंक्यपद

schedule17 Sep 25 person by visibility 96 categoryमनोरंजन

कोल्हापूर  : भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धचा बक्षिस वितरण सोहळा मंगळवारी रात्री जल्लोषात पार पडला. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीमुळे महीलांच्या उत्साहाला उधाण आले होते. या स्पर्धेत, पन्हाळा तालुक्यातील बोरगावच्या बोरजाई महिला संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. तर युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी केलेल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.

धनंजय महाडीक युवाशक्ती प्रेरीत, भागीरथी महीला संस्था आणि भाजपच्या वतीने मंगळवारी खासदार महोत्सवातर्गत झिम्मा फुगडी स्पर्धा झाल्या. मंगळवारी दिवसभर, महासैनिक दरबार हॉलमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होती. दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा, सायंकाळी पार पडला. अभिनेत्री प्राजक्ता माळी, खासदार धनंजय महाडिक, सौ. अरुंधती महाडिक, भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, सौ वैष्णवी महाडिक, सौ. अंजली महाडिक, स्पर्धेचे प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकरच्या रेवती पाटील, जिजाई मसाले कंपनीच्या वैशाली भोसले, काले बजाजचे विप्लव कासलीवाल, परीक्षक आनंद गिरी, संजय पाटील, श्रृती खांडेकर, राजश्री ढवळे, मानसी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत, विवीध गटातील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. 

यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मंचावर झिम्मा खेळत, उपस्थित महिलांचा आनंद द्विगुणीत केला. सौ. अरुंधती महाडिक यांच्या कार्याबद्दल बोलण्यासाठी, तासनतास अपुरे पडतील, असे गौरवोदगार प्राजक्ता माळी यांनी काढले. तर कृष्णराज महाडिक यांचे व्हिडीओ ब्लॉग आणि सामाजिक बांधिलकी याबद्दलही त्यांनी प्रशंसा केली. कृष्णराज महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना, माझी आई हाच माझा गुरु आणि आदर्श असल्याचे सांगितले. आपल्या माता-पित्यांचा आर्शिवाद घेतले, की कोणत्याही कामात यश मिळणार, असे सांगून, लवकरच कोल्हापुरात महिलांसाठी स्वच्छतागृह उभी करण्याची मोहिम आखल्याचे सांगितले. तसेच भागीरथी संस्थेच्या सदस्यांना या माध्यमातून रोजगार दिला जाईल, असे कृष्णराज महाडिक म्हणाले. खासदार महाडिक यांनी महिलांनी दाखवलेला उत्साह आणि प्रतिसाद याबद्दल समाधान व्यक्त केले. १४ वर्षाच्या युवतींपासून ते ९३ वर्षाच्या आजीबाईंपर्यंतच्या महिला या उपक्रमामध्ये सहभागी आहेत. ही स्पर्धा म्हणजे अरुंधती महाडिक यांच्या महिला सक्षमीकरण मोहिमेला मिळालेले यश आहे, असेही खासदार महाडिक म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणीचा महिलांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा झाला.

झिम्मा गटात पन्हाळा तालुक्यातील बोरगाव इथल्या बोरजाई महिला संघाने प्रथम क्रमांक पटकावला. चंदगड तालुक्यातील राजगोळी शिवकला झिम्मा फुगडी गटाने दुसरा क्रमांक मिळवला. चंदगडच्याच टिळकवाडी इथल्या नाविन्यसखी महिला गटाला तिसरा क्रमांक आणि गगनबावडा तालुक्यातील असळज इथल्या स्वामी समर्थ महिला ग्रुपने चौथा नंबर पटकावला. राधानगरी तालुक्यातील चंद्रे इथल्या ज्ञानेश्‍वर माऊली महिला गटाला पाचवा आणि कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी पेठ महिला गटाला सहावा क्रमांक मिळाला.
युवतींच्या झिम्मा गटात, चंदगडच्या आमरोळी इथल्या भावेश्‍वरी झिम्मा फुगडी गटाने पहिला क्रमांक मिळवला. गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे इथल्या मोरजाई ग्रुपला दुसरा क्रमांक, तर कोल्हापूरातील शिवाजी पेठ इथल्या रणरागिनी ग्रुपला तिसरा क्रमांक मिळाला. पन्हाळा तालुक्यातील राशी इथल्या रेणूका ग्रुपला चौथा, कसबा बावड्यातील धनगर गल्लीतील सावित्रीबाई फुले झिम्मा ग्रुपला पाचवा, तर गडहिंंग्लज तालुक्यातील हनिमनाळ इथल्या जय श्रीराम महिला गटाला सहावा क्रमांक मिळाला.
फुगडी गटात करवीर तालुक्यातील नंदगाव इथल्या माधुरी शिवाजी पाटील आणि रसिका शिवाजी पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला. पन्हाळा तालुक्यातील माजनाळ इथल्या अमृता राजाराम हंडे आणि अनिता सुभाष मगदूम यांच्या जोडीला दुसरा क्रमांक, तर कोल्हापुरातील गंगावेश इथल्या वनिता संदीप हंडे आणि मृणालीनी गवळी यांच्या जोडीला तिसरा क्रमांक मिळाला. पन्हाळा तालुक्यातील वेतवडे इथल्या लता दिलीप पाटील आणि सानिका सर्जेराव तावडे यांनी चौथा, तर करवीर तालुक्यातील पासार्डे इथल्या राणी शिवाजी सुतार आणि स्वाती सचिन सुतार यांनी पाचवा, तर करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या हर्षदा धनाजी भवड आणि कोमल गणेश भवड यांना सहावा क्रमांक मिळाला.
युवतींच्या फुगडी गटात करवीर तालुक्यातील केकतवाडी इथल्या रसिका मांगुरे आणि अंकिता नलवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पासार्डे इथल्या अबोली सचिन सुतार आणि तनया सचिन चौगुले यांना द्वितीय, वडणगे इथल्या सायली राजाराम पाटील, अक्षरा गजानन घोडके यांना तृतीय क्रमांक मिळाला. उत्तरेश्‍वर पेठेतील मैत्री राबाडे आणि सुभेच्छा राबाडे यांना चौथा, भुयेवाडी इथल्या वेदिका संग्राम पाटील, समिक्षा उदय पाटील यांना पाचवा, तर म्हारूळ इथल्या पूर्वा सुतार आणि सुमिधा चौगुले यांना सहावा क्रमांक मिळाला.
पारंपारिक वेशभुषा स्पर्धेत राजगोळी खुर्दच्या सुमन पाटील यांनी प्रथम पटकावला. हातकणंगले तालुक्यातील लाटवडे इथल्या प्रियांका पाटील यांनी दुसरा, हेरले इथल्या रूपाली संकपाळ यांनी तिसरा, चंदगडच्या कोवाड इथल्या विद्या राजगोळकर यांनी चौथा, पाचगाव इथल्या शितल जाधव यांना पाचवा, तर शिवाजी पेठेतील धनश्री जाधव यांना सहावा क्रमांक मिळाला.
युवतींच्या पारंपारिक वेशभुषा स्पर्धेत दुर्वा जांभळे हिनं पहिला, परिणिती केकतपुरे हिला दुसरा,  शर्वरी मानेला तिसरा, रजनी सुतारला चौथा, श्रावणी मुरावणेला पाचवा आणि वेदिका मानेला सहावा क्रमांक मिळाला.

घोडा-घोडा स्पर्धेत नंदवाळच्या सुरेखा मगदूम यांना पहिला क्रमांक मिळाला. गगनबावडा तालुक्यातील किरवे इथल्या जयश्री कांबळे यांनी दुसरा, पन्हाळा तालुक्यातील देसाईवाडी इथल्या उज्वला संकपाळ यांनी तिसरा, तर खेरीवडे इथल्या संगीता मोळे यांनी चौथा क्रमांक मिळवला. भुदरगड तालुक्यातील नादवडे इथल्या धनश्री पाटील यांना पाचवा, तर गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या वर्षा भिके यांना सहावा क्रमांक मिळाला.
  काटवट काणा स्पर्धेत मलकापूर इथल्या पूनम डवरी यांना पहिला, लाटवडे इथल्या प्रियांका पाटील यांना दुसरा, तर पणुत्रे इथल्या पौर्णिमा सुतार यांना तिसरा क्रमांक मिळाला. वाळोली इथल्या गिरीजाबाई पाटील यांना चौथा, कोतोली-माळवाडी इथल्या लता खापणे यांना पाचवा, तर शिवाजी पेठेतील सोनाबाई पोवार यांना सहावा क्रमांक मिळाला.

युवतींच्या काटवट काणा स्पर्धेत शिवाजी पेठेतील श्रेया हिरगुरे यांनी पहिला क्रमांक मिळवला. राशी इथल्या अर्पिता खोपकर यांना दुसरा, कंदलगाव इथल्या स्वरा पाटीलला तिसरा, तर याच गावातील मनाली सुतार हिला चौथा क्रमांक मिळाला. कारंडे माळ इथल्या अक्षरा बोडके हिनं पाचवा, तर केकतवाडीच्या वैदही नलवडे हिला सहावा क्रमांक मिळाला.
जात्यावरील ओव्या स्पर्धेत, दिंडनेर्ली इथल्या आनंदी दबडे यांना पहिला क्रमांक मिळाला, चंद्रे इथल्या आरती कोळी यांना दुसरा, वडणगे इथल्या छाया शेटे यांना तिसरा, फुलेवाडीतील निमा मंडेद यांना चौथा, पन्हाळ्यातील स्नेह जाधव यांना पाचवा, तर आमशी इथल्या शांताबाई पाटील यांना सहावा क्रमांक मिळाला.
घागर घुमवणे स्पर्धेत, आरती कोळी यांना पहिला, माधुरी पाटील यांना दुसरा, ऋतुजा कुसाळे यांना तिसरा, सुमन पाटील यांना चौथा, वर्षा सुर्यवंशी यांना पाचवा, उज्वला पाटील यांना सहावा क्रमांक मिळाला.

सुप नाचवणे स्पर्धेत पन्हाळा तालुक्यातील खेरिवडे इथल्या सविता मोळे यांनी पहिला क्रमांक पटकावला. गगनबावडा तालुक्यातील किरवे इथल्या सोनाली चाबुक यांना दुसरा, तर याच गावातील दिपाली वास्कर यांना तिसरा क्रमांक मिळाला. राधानगरी तालुक्यातील पंडेवाडी इथल्या उज्वला पाटील यांना चौथा, कोल्हापुरच्या विक्रमनगर मधील सुजाता बारकाळे यांना पाचवा आणि भुदरगडच्या  नाधवडेतील अश्‍विनी पाटील यांना सहावा क्रमांक मिळाला.
छुई फुई स्पर्धेत वेतवडे इथल्या कमल पाटील यांना पहिला, धोंडेवाडी इथल्या अनुराधा नलवडे यांना दुसरा, नाधवडे इथल्या सौंदर्या पाटील यांना तिसरा, कोतोली- माळवाडी इथल्या अर्चना गायकवाड यांना चौथा, केकतवाडी इथल्या स्नेहल यादव यांना पाचवा आणि आमशी इथल्या कमल पाटील यांनी सहावा क्रमांक मिळवला.

उखाणे स्पर्धेत कागल तालुक्यातील सोनाळी इथल्या संजीवनी वैद्य यांनी पहिला क्रमांक पटकावला. फुलेवाडीच्या निमा मंडेद यांनी दुसरा, तिसंगी इथल्या रूपाली खाडे यांनी तिसरा, असंडोली इथल्या संगीता देसाई यांनी चौथा, गंगावेश इथल्या महात यांनी पाचवा तर कल्पना सुतार यांना सहावा क्रमांक मिळाला.
या स्पर्धेच्या संयोजनासाठी भागीरथी संस्थेच्या सदस्या, बी न्यूजच्या वृत्तनिवेदिका आणि अनेक स्वयंसेवकांनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळंच १० हजार पेक्षा अधिक महिलांचा सहभाग असलेली ही झिम्मा फुगडी स्पर्धा प्रचंड उत्साहात आणि शिस्तबध्दरितीनं पार पडली. दरम्यान या स्पर्धेचा निकाल चॅनेल बी च्या ५३२ क्रमांकाच्या चॅनेलवर तळटिपद्वारे पाहू शकतात.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes