SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चित्रनगरीसंदर्भात कोल्हापुरात चर्चासत्रकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : संस्कृती आणि परंपरांचा उत्सव : जिल्हाधिकारी अमोल येडगेधर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सुधारणावाद हेच भारतीय संविधानाचे तत्वज्ञान: डॉ. टी. एस. पाटीलपंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम नगररचना विभागाकडून आयोजित विशेष कॅम्पमध्ये 64 प्रकरणे मंजूरस्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आयोजित शिबिराचा 250 लाभार्थ्यांनी घेतला लाभकोल्हापूर महानगरपालिका प्रारुप प्रभाग रचनेवरील प्राप्त हरकतींची शुक्रवारी सुनावणीवसतिगृह प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढसंभापूर औद्योगिक वसाहत येथे प्राथमिक सुविधा उपलब्ध असल्याने असल्याने उद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे : संस्थेच्या अध्यक्षा, माजी आमदार जयश्री जाधव यांचे आवाहनभागीरथी संस्थेच्यावतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचे जल्लोषात झाले बक्षिस वितरण, बोरगाव इथल्या बोरजाई महिला संघाने पटकावले अजिंक्यपद

जाहिरात

 

संभापूर औद्योगिक वसाहत येथे प्राथमिक सुविधा उपलब्ध असल्याने असल्याने उद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे : संस्थेच्या अध्यक्षा, माजी आमदार जयश्री जाधव यांचे आवाहन

schedule17 Sep 25 person by visibility 61 categoryउद्योग

▪️कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सभा

कोल्हापूर : संभापूर औद्योगिक वसाहत येथे रस्ते, वीज पाणी आदी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेत. यामुळे उद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा व माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले. ही एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास सुमारे दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास माजी आमदार जाधव यांनी व्यक्त केला.

येथील वाय. पी. पोवारनगरमधील उद्यम सांस्कृतिक सभागृहात कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीची  ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी माजी आमदार जाधव अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

माजी आमदार जाधव म्हणाल्या, कोल्हापूरचा औद्योगिक विकास झाला पाहिजे आणि येथील उद्योजक सक्षम बनला पाहिजे या उद्देशाने कोल्हापूर उद्यम सोसायटी काम करीत आहे. लघु उद्योजक सभासदांना औद्योगिक कारणासाठी जागा पुरविणे, लघुउद्योग वाढीस प्रोत्साहन देणे हा उद्यम सोसायटीचा मुख्य हेतू आहे. यानुसारच टोप संभापूर येथे सोसायटीच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत उभारण्यात येत आहे. येथील विजेचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून, वीज वितरण कंपनीकडून औद्योगिक वसाहतीमध्ये सबस्टेशन उभारणीसाठी सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या निधी मंजुर करून आणला. यामुळे विजेचा प्रश्न सुटला आहे. तसेच औद्योगिक वसाहत मधील कच्चे रस्ते आणि घुणकी ते संभापूर येथील पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. संभापूर येथील पाण्याची टाकी व जल शुध्दीकरण केंद्राचे काम हे पूर्ण झाले आहे. यामुळे या ठिकाणी जागा घेतलेल्या सभासदांनी उद्योग उभारणीच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी.

‘संस्थेने औद्योगिक मंदी असतानाही चांगले काम केले आहे. सभासद, फौंड्री उद्योजकांनी दाखविलेला विश्वास आणि संचालक, कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे चांगले काम करता आले असे माजी आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार प्रमुख उपस्थितांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. विषय पत्रिकेमधील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

 यावेळी उपाध्यक्ष सुधाकर सुतार, संचालक राजन सातपुते, चंद्रकांत चोरगे, हिंदुराव कामते, अशोक जाधव, संजय अंगडी, अतुल आरवाडे, आनंद पेंडसे, संजय थोरवत, अविनाश कांबळे, अमर कारंडे, संगीता नलवडे यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद व उद्योजक कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष सुधाकर सुतार यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes