कोल्हापूर : पाणी पुरवठा सवलत योजनेमधून 73 लाख 59 हजार वसूल
schedule20 Jan 25 person by visibility 209 categoryमहानगरपालिका
▪️या योजनअंतर्गत 2223 थकबाकीधारकांचा 9 लाख 93 हजार विलंब आकार माफ
कोल्हापूर : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या थकीत पाणी बिलाची संपूर्ण थकबाकी एक रक्कमी रक्कम जमा केल्यास विलंब आकारामध्ये 80 टक्के सवलत जाहिर करण्यात आली आहे. हि योजना दिनांक 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 अखेर राबविण्यात येत आहे. या सवलत योजनेमधून आज अखेर 73 लाख 59 हजार 857/- इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. सदरची सवलत योजना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली आहे.
या सवलत योजनेअंतर्गत आज अखेर 2223 थकबाकीधारकांचा 9 लाख 93 हजार 521 इतका विलंब आकार माफ करण्यात आला आहे. तर 2 लाख 58 हजार 062/- इतका विलंब आकार वसूल करण्यात आला आहे. दि.01 एप्रिल 2024 ते आज अखेर रु.37 कोटी 27 लाख 23 हजार 726 इतकी वसुली झाली असून यामध्ये नागरी सुविधा केंद्रामधून 23 कोटी 54 लाख 28 हजार 194, ऑनलाईन 2 कोटी 59 लाख 54 हजार 840, भारत बिलद्वारे 9 कोटी 38 लाख 27 हजार 702 व जागेवर स्पॉट बिलींगद्वारे 1 कोटी 75 लाख 12 हजार 990 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत 38 नळ कनेक्शन खंडीत करण्यात आली आहेत.