कोल्हापूर : मतदारांना नाव शोधण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र सुरू
schedule26 Nov 25 person by visibility 51 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने प्रसिध्द झालेल्या प्रारूप मतदार यादीतील स्वतःचे नाव शोधणे नागरिकांना सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेच्यावतीने सर्व विभागीय कार्यालयांत तसेच नागरी सुविधा केंद्रांत मतदार सहाय्यता केंद्र (Help Desk) सुरू करण्यात आली आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दि.20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात आली असून दि.27 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी महापालिकेने विविध विभागांमध्ये ही मतदार सहाय्यता केंद्रे सुरु करण्यात आली आहे.
▪️मतदार सहाय्यता केंद्रे
१. विभागीय कार्यालय क्र.1 ते 4
२. सर्व नागरी आरोग्य केंद्रे
३. सर्व नागरी सुविधा केंद्रे
४. जनसंपर्क कार्यालय
▪️नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
प्रारूप मतदार यादीतील आपले नाव योग्य प्रभागात समाविष्ट झाले आहे की नाही, हे तपासण्यासाठी नागरिक https://mahasecvoterlist.in या संकेतस्थळावरील शोध सुविधा वापरू शकतात. जे नागरिक ऑनलाईन शोध करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी या सर्व कार्यालयांमध्ये मदत केंद्रे कार्यरत राहतील.