SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी चोरी करणाऱ्या टोळीस अटक; ३,१३,०००/- रूपयेचा माल जप्तकोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवर तरुणाचा खून मोरारी बापू यांची राम कथा सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभकोरे अभियांत्रिकीत “आधुनिक वाहतूक भू-अभियांत्रिकी” विषयावरील कार्यशाळेस प्रारंभअनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस १४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ : संजय शिरसाटकोल्हापूर महानगरपालिका व महाप्रीत यांच्यात सामंजस्य करारशारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिर परिसरासह विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमदेवस्थानाच्या मूळ ढाच्याला धक्का लागता कामा नये : सहपालकमंत्री माधुरी मिसाळकोल्हापूरच्या परंपरेला साजेसा दसरा महोत्सव व्हावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

जाहिरात

 

कोल्हापुरात बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी चोरी करणाऱ्या टोळीस अटक; ३,१३,०००/- रूपयेचा माल जप्त

schedule13 Sep 25 person by visibility 113 categoryगुन्हे

कोल्हापूर  : सरनाईक कॉलनी येथील बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी चोरी करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीतील ० २ एलईडी टीव्ही सह एकूण ३,१३,०००/- रूपयेचा माल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.

फिर्यादी समरजितसिंह विक्रमसिंह पाटील, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, राजारामपूरी ११ वी गल्ली, कोल्हापूर यांची आजी श्रीमती शारदा गणपतराव चव्हाण यांचे मालकीचे प्रिया बंगला, सरनाईक कॉलनी, टाकाळा, कोल्हापूर या बंद बंगल्याचे दिनांक ०६/०९/२०२५ ते ०९/०९/२०२५ रोजी दरम्यान मुदतीत दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून ०२ एलईडी टीव्ही, देवघरातील चांदीच्या मुर्ती व चांदीचे कॉईन असा किंमती मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेने राजारामपूरी पोलीस ठाणे येथे दि. ०९/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 मिळालेल्या माहितीनुसार घरफोडी ही आदित्य दिंडे व त्याचे साथीदार यांनी केली आहे. अशी गोपनीय माहिती मिळालेने नमुद तपास पथकाने कणेरीवाडी कमान येथे सापळा लावला असता अ‍ॅक्सेस मोटर सायकलवरून आदित्य दिंडे व त्याचे दोन साथीदार आले त्यांना सापळा लावून पकडले त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १] आदित्य भिमराव दिंडे, वय २३ रा. नवशा मारूती मंदिर, राजारामपूरी, कोल्हापूर २] वैभव दिलीप कांबळे, वय १९ रा. माधवनगर, कणेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर ३] सुमित अमर जाधव, वय २१ रा. माधवनगर, कणेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर अशी आहेत. त्यांची दोन पंचांचे समक्ष झडती घेतली असता गाडीच्या डीकीत चांदीचे कॉईन, चांदीच्या ०४ मुर्त्या, पितळेच्या मुर्त्या, तांब्याची भांडी व ४,०००/- रूपये रोख रक्कम असा माल मिळून आला त्याबाबत त्यांचेकडे अधिक तपास केला असता आरोपी आदित्य दिंडे याने सांगीतले की, त्याने व त्याचे साथीदार वैभव कांबळे, सुमित जाधव, संदेश शेळके, बलराजसिंह दुधाने असेनी मिळून गेली तीन दिवसापुर्वी रात्रीच्या वेळी सरनाईक कॉलनी टाकाळा येथील बंद बंगल्याचे कुलूप तोडून वर नमुदच्या वस्तु तसेच ०२ टीव्ही व रोख रक्कम असे चोरले आहे. त्यापैकी ०२ टीव्ही सुमित जाधव याचे घरामध्ये ठेवल्या आहेत अशी माहिती दिली. सदर आरोपी यांचे अंगझडतीत व सुमीत जाधव याचे घरातून ०२ एलईडी टीव्ही, चांदीचे कॉईन, चांदीच्या ०४ मुर्त्या, पितळेच्या मुर्त्या, तांब्याची भांडी, रोख रक्कम, मोपेड गाडी व मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ३,१३,०००/- रूपयेचा माल कायदेशिर प्रक्रीया करून जप्त केला.

सदर तीनही इसमांना ताब्यात घेवून त्यांचे माहितीने त्यांचे इतर दोन साथीदार यांचा शोध घेतला ते दोन्ही साथीदार अल्पवयीन असल्याचे आढळून आले. मुद्देमालासह आरोपी हे पुढील कारवाई करीता राजारामपूरी पोलीस ठाणे येथे हजर केले असुन पुढील तपास राजारामपूरी पोलीस ठाणे करवी सुरु आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक,  योगेशकुमार गुप्ता साो, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, संतोष बरगे, समीर कांबळे, राजु कांबळे, शिवानंद मठपती, प्रदिप पाटील, विशाल खराडे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, अरविंद पाटील व राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes