कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवर तरुणाचा खून
schedule13 Sep 25 person by visibility 114 categoryगुन्हे

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड परिसरातील गंगाई लॉनजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या सशस्त्र हल्ल्यात महेश राख या तरुणाचा खून करण्यात आला आहे. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचे समजते
तलवार, एडका, फायटर, लोखंडी गज यांचा वापर करत सशस्त्र हल्ला केला आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात सिद्धांत गवळी, आदित्य गवळी, धीरज शर्मा, ऋषभ साळुंखे, मयूर कांबळे, पियूष पाटील, सद्दाम कुंडले या सात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह.
घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अधिकचा तपास करवीर पोलीस ठाणे करत आहे.