शाश्वत विकासाला वेग देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर; कोल्हापूरी चप्पल, वस्त्रोद्योगास सुगीचे दिवस
schedule01 Feb 26 person by visibility 103 categoryराजकीय
कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प आरोग्य, कृषि, उद्योग, पायाभूत सोयीसुविधांसह कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञानाला सामावून घेण्यासाठी उत्तेजन देणारा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०४७ पर्यंत देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या उद्दिष्ठाला आणि देशाच्या शाश्वत विकासाला वेग देणारा हा अर्थसंकल्प आहे. अशी प्रतिक्रिया आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले आहे
आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून देशांतर्गत उत्पादन क्षमता, उर्जा सुरक्षा आणि आवश्यक आयातीवरील अवलंबित्व कमी केले आहे. यासह रोजगार निर्मिती, कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी, घरगुती खरेदी शक्ती सुधारण्यासाठी आणि नागरिकांना सार्वत्रिक सेवा प्रदान करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सुधारणांमुळे विकास दर वाढला असून, खऱ्या अर्थाने "गरिबी हटाव" च्या दिशेने देशाने वाटचाल अधिक सक्षम केली आहे. विशेषतः चामड्यांची उत्पादने आणि कापडांची निर्यात देखील शुल्कमुक्त केली असल्याने कोल्हापुरी चप्पल आणि वस्त्रोद्योगास सुगीचे दिवस येणार आहेत.
एकंदरीत पाहता देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा, शाश्वत विकासाची हमी देणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडिया @४७ संकल्पनेतून देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या निश्चयाला बळ देणारा अर्थसंकल्प असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हंटले आहे .