SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शाश्वत विकासाला वेग देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर; कोल्हापूरी चप्पल, वस्त्रोद्योगास सुगीचे दिवसयंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या पुर्ततेचं आणखी एक पाऊल : खासदार धनंजय महाडिक कोरे अभियांत्रिकीत मेटलॅब विषयावर यशस्वी कार्यक्रमाचे आयोजनबजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग...“देशाच्या जनसांख्यिकीय लाभांशाची पोषकता वाढविण्यासाठी प्रगत अनुदेशन पद्धतीद्वारे कौशल्य निर्मितीची गरज” : प्रा.डॉ.किरणकुमार शर्माशिवाजी विद्यापीठात संत रविदास महाराज जयंतीजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : भुदरगड भरारी पथकाची धडक कारवाई; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त; उमेदवारावर आचारसंहिता भंग गुन्हा दाखलरांगोळी येथील संवेदनशील खुनाचा गुन्हा उघड, तीन आरोपी अटक.समूहभावाचे खेड्याचे जीवनतत्व भंगल्यानेच सामाजिक प्रश्र्न वाढले : ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीत मेटलॅब विषयावर यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन

schedule01 Feb 26 person by visibility 113 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : ताट्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त), वारणानगर येथे मेटलॅब विषयावर प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न झाला. सदर कार्यक्रम इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन ॲप्लिकेशन इंजिनिअर  अंकित कुमार, प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, संयोजक डॉ. एस. टी. जाधव, डॉ. आर. बी. पाटील तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. अनिकेत एस. तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले. 

उद्घाटनप्रसंगी डॉ. एस. एम. पिसे यांनी अभियांत्रिकी शिक्षण, संशोधन व उद्योगसहकार्य यामध्ये मेटलॅबसारख्या संगणकीय साधनांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमास वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष  आमदार विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी  एन. एच. पाटील तसेच वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.विलास कारजिन्नी  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या प्राध्यापक विकास कार्यक्रमासाठी डिझाइन टेक सिस्टीम्स प्रा. लि., पुणे येथील ॲप्लिकेशन इंजिनिअर श्री. अंकित कुमार हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी मेटलॅब प्रोग्रामिंग, डेटा विश्लेषण, प्रतिकृतीकरण, सिम्युलेशन तसेच अध्यापन व संशोधनातील विविध उपयोजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश असल्याने सहभागी प्राध्यापकांना मेटलॅबचा प्रत्यक्ष वापर अनुभवता आला.

या कार्यक्रमासाठी ७० पेक्षा अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. सहभागी सदस्य हे अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, बीसीए, फार्म-डी, डी-फार्मसी तसेच विज्ञान शाखांतील प्राध्यापक होते. कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम समन्वयक प्रा. अनिकेत एस. तोडकर यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes