SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा : अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांची माहितीपाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागरडी. वाय. पाटील अभियांत्रिकी एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार : आमदार सतेज पाटीलसीबीएसई साऊथ झोन-२ बॉक्सिंग स्पर्धेचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजनपंढरपुरातील भक्तनिवास शिरोळ तालुक्यातील वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल : आमदार यड्रावकरकोल्हापूर शहराचा कायम स्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य : आ. राजेश क्षीरसागरसन्मान ..... कर्तृत्वाचा !कोल्हापूर जिल्ह्यातील 10 बंधारे पाण्याखालीप्रा. यास्मिन शेख यांचे पुण्यात निधन; मराठीवरील प्रभुत्त्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

जाहिरात

 

कोरे डिप्लोमा कॉलेजचा इंडक्शन कार्यक्रम जल्लोषात संपन्न

schedule07 Aug 25 person by visibility 903 categoryशैक्षणिक

वारणानगर : TKIET डिप्लोमा कॉलेज, वारणानगर येथे 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीत आयोजित स्टुडंट इंडक्शन व ओऱिएंटेशन प्रोग्राम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. उदघाटन दिवशी श्री.वारणा विभाग शिक्षण मंडळाचे CEO डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी वारणा युनिवर्सिटी म्हणजे काय ? नवागत विद्यार्थ्यांना नवीन संधी, नाविन्यपूर्ण विचार आणि यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. 

कॅम्पस टूरमध्ये वसतिगृह, ग्रंथालय, वारणा बँक, शिवनेरी ग्राउंड आदी महत्त्वाच्या सुविधांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.विभाग प्रमुख आणि विविध सेल्सचे समन्वयक यांनी शैक्षणिक धोरणे, परीक्षा प्रणाली, ग्रिव्हन्स सेल, महिला तक्रार निवारण सेल याबाबत माहिती दिली.विशेष सत्रात, "मानव मूल्य व व्यावसायिक नैतिकता" या विषयावर कृष्णात स्वाती (राज्य सरचिटणीस – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती) यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

प्राचार्य प्रा. पी. आर. पाटील यांनी "Engineer म्हणजे कोण?" या संकल्पनेचा अत्यंत सोप्या व प्रेरणादायी शब्दांत परिचय करून देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला.डॉ. पी. एम. पाटील यांनी येणाऱ्या काळातील आव्हाने, स्पर्धा व आवश्यक कौशल्यांवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. 

कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. ए. पी. देशमुख व प्रा. टी. ए. पाटील यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचलन प्रा. ए. व्ही.पाटील यांनी केले, तसेच प्रा. ए.एन. गुरव यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले.नवीन विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम ज्ञान, मूल्य आणि प्रेरणेचा सुंदर अनुभव ठरला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes