SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पंढरपुरातील भक्तनिवास शिरोळ तालुक्यातील वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल : आमदार यड्रावकरकोल्हापूर शहराचा कायम स्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य : आ. राजेश क्षीरसागरसन्मान ..... कर्तृत्वाचा !कोल्हापूर जिल्ह्यातील 10 बंधारे पाण्याखालीप्रा. यास्मिन शेख यांचे पुण्यात निधन; मराठीवरील प्रभुत्त्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजलीतंत्रज्ञान युगात ‘जीआयएस’चे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्केमुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदतविद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूलमध्ये 'इंटरॅक्ट क्लब'चा पदग्रहण सोहळा उत्साहात ​आधुनिक 'कोलकाता' शहराचा पाया कसा रचला गेला? साहेब .... एकच नंबर काम

जाहिरात

 

कोल्हापूर शहराचा कायम स्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य : आ. राजेश क्षीरसागर

schedule24 Aug 26 person by visibility 127 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर :  कोल्हापूर शहरास काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करून येथील पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्याला आपले प्राधान्य राहील असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले .

    थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेस बळकटी येण्यासाठी धरण परिसरात महापारेषणचे सब स्टेशन स्थापन करण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले , पाणीपुरवठा पुण्याच्या अनुषंगाने धरण क्षेत्रात महापारेषणचे सब स्टेशन होणे आवश्यक आहे. हे सब स्टेशन उभे करण्यासाठी MSEB ला किती कालावधी लागेल ? याचीही विचारणा त्यांनी याप्रसंगी केली .

  वीज मंडळाने सब स्टेशनसाठी जागा फायनल करून त्याचा सुधारित आराखडा शासनाकडे पाठवावा. तसेच या सब स्टेशनसाठी धरण क्षेत्रातील जागा फायनल करून ती जागा उद्याच्या उद्या पाहून घ्यावी असे निर्देश, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले तर या सब स्टेशनसाठी वन (फॉरेस्ट) विभागाची जागा न घेता जलसंपदा विभागाची जागा घेतल्यास ती योग्य होईल असे मत मनपा आयुक्त राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केले.

    यावेळी अतिरिक्त आयुक्त (मनपा) शिल्पा दरेकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत , श्री कांबळे , महापारेषणचे अधिक्षक अभियंता अभिजीत धमाले, MSEB चे (शहर) कार्य.अभियंता अभिजीत सिकणीस, महा पारेषणच्या कार्य.अभियंता स्मिता कुलकर्णी, मनपाचे उप अभियंता जयेश जाधव यांच्यासह वन,जलसंपदा आणि वीज मंडळाचे इतर अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes