जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी : आमदार सतेज पाटील यांनी दऱ्याचे वडगाव येथे नागनाथ मंदिर परिसरात कार्यकर्त्यांबरोबर पंगतीत जेवण करून जिव्हाळा, स्नेह जपला
schedule26 Jan 26 person by visibility 189 categoryराजकीय
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढत दऱ्याचे वडगाव येथील नागनाथ मंदिर परिसरात कार्यकर्त्यांबरोबर पंगतीत जेवण केले. प्रचाराच्या धावपळीतही कार्यकर्त्यांशी असलेली आपली नाळ जपताना साध्या पंगतीत जेवण करून त्यांनी जिव्हाळा आणि स्नेह जपला.
सत्तेपेक्षा साथ महत्त्वाची मानणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या या कृतीतून कार्यकर्त्यांशी असलेलं घट्ट नातं आणि जमिनीवरचं नेतृत्व अधोरेखित झालं. नागनाथ मंदिराच्या परिसरात पार पडलेल्या या पंगतीनंतर कार्यकर्ते भारावले त्यांच्यात उत्साहाचं आणि सकारात्मक ऊर्जेचं वातावरण पाहायला मिळालं. दिवसभराच्या थकव्यावर उतारा ठरलेला हा क्षण प्रचाराच्या धावपळीत एक दिलासा देणारा ठरला.
जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला तसेच महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवार निवडून येतील जिल्हा परिषद वर सत्ता येईल असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.