SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागतमहिला भाविकांसाठी कोल्हापुरात उपलब्ध होणार स्वच्छतागृहकोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चितऊसतोड मजूर आणि साखर कारखाने दोघांनाही मिळणार न्याय; खा. धनंजय महाडिक यांनी सुचवला सुवर्णमध्य!‘गोकुळ’ची दमदार प्रगती ठेवी ६०४ कोटीवर ; दूध संकलन २५ लाख लिटरचे उद्दिष्ट : नामदार हसन मुश्रीफशेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची : न्या.अभय आहुजाकोल्हापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादात कंदमूळ महोत्सवाचा समारोपगॅसचा जिल्ह्यात पुरेसा साठा; नागरिकांनी आवश्यकतेनुसारच सिलेंडर बुकिंग करावे : पालकमंत्री१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस​"सरकारी नोकरी सोडून समाजक्रांतीचा ध्यास घेणारे: मान्यवर काशिराम!"

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित

schedule15 Mar 26 person by visibility 266 categoryराजकीय

◼️ अध्यक्ष-उपाध्यक्ष पद सव्वा वर्षासाठी, तर सभापती पदासाठी एक वर्ष, ५ वर्षात ४ अध्यक्ष, ४ उपाध्यक्ष आणि २० सभापती होणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यांच्या ६८ पैकी ५१ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. निर्विवाद बहुमत मिळाल्याने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच  होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज कोल्हापूर विमानतळावर बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद सव्वा वर्षासाठी तर सभापतीची ४ पदे एक वर्षासाठी देण्याचा निर्णय झाला. या फॉर्म्युल्यानुसार ५ वर्षात जिल्हा परिषदेला ४ अध्यक्ष, ४ उपाध्यक्ष आणि २० सभापती मिळणार आहेत. महायुतीच्या ५१ पैकी २८ सदस्यांना ५ वर्षात संधी मिळणार आहे. १७ मार्च रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड होणार आहे. पण अध्यक्षपदाच्या नावाचा सस्पेन्स कायम आहे.

   कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ५१ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी २०, भाजप १२, शिवसेना ९, शाहू आघाडी ४, जनसुराज्य ५ आणि १ अपक्ष महायुतीकडे आहे. १७ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची आज कोल्हापूर विमानतळावर बैठक झाली. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, प्रा. जयंत पाटील, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम आणि माजी आमदार सुजीत मिणचेकर बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हा परिषदेतील सत्ता वाटपावर चर्चा झाली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद सव्वा वर्ष तर सभापती पद एक वर्षासाठी देण्याबद्दल नेत्यांमध्ये एकमत झाले.  म्हणजेच ५ वर्षात ४ अध्यक्ष आणि ४ उपाध्यक्ष होतील. बांधकाम आणि आरोग्य, अर्थ आणि शिक्षण, समाजकल्याण तसेच महिला बालकल्याण या ४ सभापती पदासाठी एका सदस्याला एक वर्ष संधी दिली जाईल. म्हणजेच ५ वर्षात २० सभापती होतील. एकूणच महायुतीच्या ५१ सदस्यांपैकी २८ सदस्यांना ५ वर्षात पदे मिळणार आहेत. उपाध्यक्षांकडे कृषी आणि पशुसंवर्धन समिती राहील. एकूणच महायुतीने अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि सभापतीपद वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. पण पहिल्या वर्षी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण आणि कोणत्या पक्षाचा होणार, याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes