SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची : न्या.अभय आहुजाकोल्हापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादात कंदमूळ महोत्सवाचा समारोपगॅसचा जिल्ह्यात पुरेसा साठा; नागरिकांनी आवश्यकतेनुसारच सिलेंडर बुकिंग करावे : पालकमंत्री१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस​"सरकारी नोकरी सोडून समाजक्रांतीचा ध्यास घेणारे: मान्यवर काशिराम!"कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाहीभाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट, महाविद्यालयीन निवडणुकीची कार्यपद्धती घेतली जाणूनप्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट ​"६३ वर्षांची उज्ज्वल परंपरा अन् नवी झेप! गोकुळच्या वर्धापन दिनानिमित्त 'गोकुळ आईस्क्रीम' लाँच आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन"'पालकत्वाचा लढा होईल सोपा; पद्माराजे हायस्कूलचा मदतीचा हात!'

जाहिरात

 

कोल्हापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादात कंदमूळ महोत्सवाचा समारोप

schedule15 Mar 26 person by visibility 74 categoryसामाजिक

कोल्हापूर : निसर्गअंकुर,कोल्हापूर वुई केअर एनजीओ कम्पॅशन २४ या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था,गार्डन्स क्लब ,युथ ऍनेक्स , वुई केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्याने  २५०हून अधिक कंदमुळांचे माहितीपूर्ण शास्त्रीय प्रदर्शन कोल्हापूर शहरातील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृह,दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय कंदमूळ महोत्सवाची आज सांगता झाली. कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद दिला.

अनेकांनी विक्रीस असलेल्या कंदमुळांची खरेदी केली. तर काहीजणांनी आपल्या बागेत तसेच शेतात लागवडीसाठी कंदमुळे खरेदी केली. तसेच कंदमळांपासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वादही घेतला. अतिशय दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेली प्राचीन कंदमुळे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. रताळ्याचे, बटाट्याचे अनेक प्रकार तसेच अळूचे आणि हळदीचे विविध प्रकार या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते. तसेच प्रत्येक कंदमुळाची अभ्यासपूर्ण माहिती त्यातील औषधी गुणधर्म आणि त्याचा आहारात वापर कसा करावा याची माहिती देखील देण्यात आली होती. त्यामुळे कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनास मोठी गर्दी केली होती.

 आदिमानवापासून ते रामायण महाभारत अशा प्राचीन काळामध्ये कंदमुळे हे महत्त्वाचा घटक मानले जायचे. परंतु कालांतराने त्यांचे महत्त्व कमी झाले. परंतु या प्रदर्शनामुळे पाच राज्यातून आणलेली कंदमुळे लोकांना बघायला मिळाली. त्यांची ओळख झाली तसेच त्यांचे शास्त्रीय महत्त्व समजले.
मोहन माने यांच्या प्रयत्नातून पाच राज्यांसह महाराष्ट्रातील २५० कंदमुळे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. निसर्ग अभ्यासक डॉ. मधुकर बाचूळकर यांनी सांगितले.

      “लेट्स गेट बॅक टु अवर रूट्स “ह्या ब्रीदवाक्याचा अंगिकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात येणार असल्याचे एनजीओ कम्पॅशन २४", "कोल्हापूर वुई केअर "चे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी समारोपा प्रसंगी सांगितले.

या प्रदर्शनात कणगा ,काटे कणंग ,कोराडू ,करांदा, वराहकंद ,वासकंद ,पासपोळी , शेंडवेल ,कडुकंद, आळसी ,शेवळा , सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे , हवाई बटाटे, कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू ,काळा अळू ,हिरवा अळू ,पांढरा पेरव , उंडे ,शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद , त्याचबरोबर काळी हळद ,आंबेहळद ,रानहळद ह्या सारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद तसेच अमेरिकन अळू, चिनी बटाटे इ.विदेशी कंदमुळे अशाप्रकारच्या सुमारे २५०  हुन अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती, प्रजातींची मांडणी केली आहे.

      गार्डन्स क्लब, मंजिरी कपडेकर कूकींग क्लासेस , प्रा. डॉ. एन. डी.पाटील महाविद्यालय, मलकापूर ,युथ ऍनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन या संस्थांचे सहकार्य प्रदर्शनास लाभले आहे. 
वुई केअरचे प्रमुख मिलींद धोंड,निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मधुकर बाचुळकर, मोहन माने,गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, भूषण पाटील,अभिजीत पाटील, अमृता वासुदेवन, सुप्रिया भस्मे, प्रा.अशोक वाली, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes