SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ॲपद्वारे खत खरेदीची सक्ती रद्द करावी; आमदार सतेज पाटील यांची मागणी..चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनजयसिंगपूर नगरपरिषद सर्वसाधारण सभेसमोरील विषयांना बहुमताने मंजुरीनाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजनराज ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे वाहतूक सेनेतर्फे शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होणार शिरोली एमआयडीसीत अवैध्य गॅस विक्रीचा पर्दाफाश: ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्तसिद्धगिरी हॉस्पिटलने रचला जागतिक वैद्यकीय इतिहास: जगातील पहिली १७ तासांची अतिदुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी विविधतेचा उत्सव: जागतिक एकता साधणारा 'आंतरराष्ट्रीय संस्कृती संवाद दिन'शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाव्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

जाहिरात

 

जयसिंगपूर नगरपरिषद सर्वसाधारण सभेसमोरील विषयांना बहुमताने मंजुरी

schedule10 Jun 26 person by visibility 120 categoryराज्य

जयसिंगपूर : जयसिंगपूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी पालिकेच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, सभेसमोरील सर्व अकरा विषय बहुमताने मंजूर करण्यात आले, नगरसेवक अर्जुन देशमुख यांनी विषय पत्रिकेवरील 1 ते 09 विषय मंजूर असल्याचे सांगितले यावर सत्ताधारी गटातील सर्व सदस्यांनी यास अनुमोदन दिले.

 सभेसाठी उपस्थित असलेल्या विरोधी आघाडीतील पाच पैकी चार सदस्यांनी विषय क्रमांक 1 मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे,2 स्थायी समिती ठरावाचे अवलोकन करणे, 5 सरळ सेवा भरती पूर्वी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे व पदोन्नती समितीकडे प्रस्ताव सादर करणे. 6. 15 व्या वित्तआयोगातून पाणीपुरवठा विभाग, व विविध विभागातील लाईट बिल भरणे बाबत निर्णय घेणे.7. जयसिंगपूर शहर मंजूर विकास आराखडा मधील आरक्षित क्षेत्राचे भूसंपादन करणे.8. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या गव्हर्निंग कौन्सिलवर नगरसेवकांचे नामनिर्देशन करणे या विषयांना हरकत नोंदवताना विरोध नोंदवला, तर विषय क्रमांक 3. स्वेच्छा निवृत्ती बाबत आलेल्या अर्जांचा विचार करणे.4. वारसा हक्क नोकरी संदर्भात ज्येष्ठता यादी तयार करणे.9. जयसिंगपूर नगरपरिषदेचे एलईडी फलक भाडेपट्ट्याने देणे या विषयांना मंजुरी दिली, सभेमध्ये नगरसेवक अर्जुन देशमुख व बजरंग खामकर यांची स्थानिक स्वराज्य संस्था गव्हर्निंग कौन्सिल मुंबई निवडणुकीकरिता सदस्य म्हणून निवड करण्याबाबतचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला यावेळी सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी देशमुख व खामकर यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले.

आजच्या बैठकी मधील चर्चेत नगरसेवक अर्जुन देशमुख, शितल गतारे, पराग पाटील, संतोष जाधव, संजय पाटील कोथळीकर यांनी सहभाग घेतला, सभेपुढील सर्व विषय बहुमताने मंजूर झाल्याचे सभाध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी जाहीर केले, उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह  नगरसेवक नगरसेविका सभेस उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes