SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जयसिंगपूर नगरपरिषद सर्वसाधारण सभेसमोरील विषयांना बहुमताने मंजुरीनाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजनराज ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे वाहतूक सेनेतर्फे शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होणार शिरोली एमआयडीसीत अवैध्य गॅस विक्रीचा पर्दाफाश: ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्तसिद्धगिरी हॉस्पिटलने रचला जागतिक वैद्यकीय इतिहास: जगातील पहिली १७ तासांची अतिदुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी विविधतेचा उत्सव: जागतिक एकता साधणारा 'आंतरराष्ट्रीय संस्कृती संवाद दिन'शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाव्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मानउंचगावमध्ये स्मार्ट मीटर सक्तीला शिवसेनेचा विरोध; स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम नको: विक्रम चौगुले यांचा इशाराइंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

जाहिरात

 

राज ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे वाहतूक सेनेतर्फे शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होणार

schedule10 Jun 26 person by visibility 98 categoryसामाजिक

कोल्हापूर  : ​महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरातील गरजू कुटुंबांना शालेय शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. सलग १४ व्या वर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, गेल्या १३ वर्षांपासून गरजू विद्यार्थी, नागरिक आणि अंधशाळा या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.

 राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजूंच्या मदतीसाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी गरजू विद्यार्थी व नागरिकांनी शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी सकाळी ११.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी मनसे वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू जाधव, अतुल भालकर अभिजीत राऊत राहुल कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes