SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राशिवडेमध्ये गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक, गांजा जप्ततरुणाईच्या प्रेमाचा, स्वाभिमानाचा आणि स्वॅगचा नवा आवाज - ‘रुबाब’ ६ फेब्रुवारीपासून प्रदर्शित!डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परिक्षेत उच्चांकी निकालउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांच्या डोक्यावर मायेचा हात…उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादनहा अर्थसंकल्प नाही, तर जनतेची क्रूर थट्टा : आमदार सतेज पाटील अर्थसंकल्प प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी!; विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशाश्वत विकासाला वेग देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर; कोल्हापूरी चप्पल, वस्त्रोद्योगास सुगीचे दिवसयंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या पुर्ततेचं आणखी एक पाऊल : खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

राशिवडेमध्ये गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक, गांजा जप्त

schedule02 Feb 26 person by visibility 153 categoryगुन्हे

कोल्हापूर  : राशिवडेमध्ये गांजा विक्री करणाऱ्या एकाच ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून 01 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.

तपास पथकातील पोलीस अंमलदार युवराज पाटील यांना  बातमी मिळाली की, राधानगरी पोलीस ठाणे हददीमधील राशीवडे येथे राहणारा मोहन वाडकर हा त्याचे अॅपे पिकअप मालवाहतूक रिक्षातून गांजाची चोरून विक्री करीत असलेबाबत  माहिती मिळाली वाडकर हा आज राशीवडे येथून परिते येथे येणार असल्याबाबत गोपणीय माहिती मिळाली आहे. त्या माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक  सुशांत चव्हाण यांनी छापा कारवाई कामी सुचना दिल्या. त्यानुसार पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ व अमंलदार यांनी राशीवडे ते परिते जाणारे रोडवर पाटील यांचे पोल्ट्रीफार्म जवळ जावुन छापा कारवाई केली, छापा कारवाई मध्ये त्यांनी एका व्यक्तीस ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मोहन कृष्णात वाडकर, वय 61 रा. मगदूम गल्ली, राशिवडे ता राधानगरी, कोल्हापूर असे सांगीतले त्याचे कब्जातुन पथकाने 01 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला त्याचप्रमाणे ताब्यात घेतलेल्या इसमाची अंगझडती घेतली व त्याचेकडुन मोबाईल हँडसेट अॅपे मालवाहतूक रिक्षा असा एकुण 1,39,000/- रुपयेचा मुददेमाल  जप्त केला.

चोरुन गांजा विक्री करणारा  मोहन कृष्णात वाडकर याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने, राशीवडे व आसपास गावातील स्थानिक लोकाना चोरुन गांजा विक्री करीत असलेचे सांगीतले मोहन कृष्णात वाडकर याचे विरुध्द राधानगरी पोलीस ठाणेस एन.डी.पी.एस. कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राधानगरी पोलीस ठाणे करीत आहेत.

ही कामगिरी  पोलीस अधीक्षक,  योगेश कुमार , अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार साो, उपविभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी विभाग  अप्पासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार सहा फौज, संजय देसाई, युवराज पाटील, अमित सर्जे, विजय इंगळे, अशोक पोवार, निवृत्ती माळी, महेश आंबी, संजय हुंबे, राजू कोरे चालक सुशिल पाटील यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes