कोल्हापूर महापालिका व रंगकर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी रंगभूमी दिन साजरा
schedule05 Nov 25 person by visibility 55 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने व रंगकर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. उपशहर अभियंता सुरेश पाटील यांच्याहस्ते सकाळी नटराज मुर्तीचे पुजन करण्यात आले. त्यानंतर नाट्यगृह पुर्ण बांधणीबाबत रंगकर्मी यांनी आपली मनोगते व्यक्तत केली.
उपशहर अभिंयता सुरेश पाटील यांनी संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कलाप्रेमींसाठी व कोल्हापूरच्या कला रसिकांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रयत्नशिल असल्याचे सांगितले. या कामाकडे विशेष लक्ष देण्यासाठी स्वतंत्र अभियंता नेमण्यात आला आहे. नव्या इमातीसाठी आवश्यक असणारी जागा महापालिकेने रितसर ताब्यात घेतली असून त्याचा आराखडा शासनाकडे सादर केला असून लवकरात लवकर सर्व कामे पुर्ण करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्यानंतर रंगकर्मी यांनी एक तास आपली कलानिकष सादर केली.
यावेळी कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, व्यवस्थापक समीर महाब्री, मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर रंगकर्मीचे किरणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी, सुनिल घोरपडे, आनंद काळे उपस्थित होते.