मॅट्रीकपूर्व व गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत
schedule04 Nov 25 person by visibility 53 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील इ. 1 वी ते 10 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती/ गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज महाडीबीटी प्रणालीव्दारे (ऑनलाईन) भरावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण फी परीक्षा फी - दर महिना - 150 व वार्षिक - 1500, इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या इमाव प्रवर्गातील मुलींकरीता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (OBC)- दर महिना - 250 व वार्षिक - 2500, इ.8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या इमाव प्रवर्गातील मुलींकरीता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (OBC)- दर महिना - 300 व वार्षिक - 3000, इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील मुलींकरीता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (VJNT/SBC)- दर महिना - 60 व वार्षिक - 600, इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील मुलींकरीता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती- दर महिना - 300 व वार्षिक - 3000 अशी शिष्यवृत्ती दहा महिने देण्यात येणार आहे.
माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील 5 वी ते 7 वी आणि 8, 9 व 10 वी विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना (VJNT/SBC) वर्गातुन प्रथम येणारे पहिल्या दोन विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. वरील सर्व योजना महाडीबीटी प्रणालीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर https://permatric.mahait.org ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत आणण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी https://permatric.mahait.org या पोर्टलवर आपल्या यूजर आयडी (User Id) व पासवर्ड (Passward) द्वारे लॉगीन करुन शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करावे.
वरील ऑनलाईन अर्ज मुख्याध्यापकांच्या लॉगिनवरुन ऑनलाईन प्रणालीद्वारे सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.