SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बीएचएमएस आणि सीसीएमपी पात्र डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार : मंत्री हसन मुश्रीफशिवाजी विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी हुबळीच्या ट्रस्टसमवेत सामंजस्य करारशिवाजी विद्यापीठात लोकमान्य टिळक जयंतीआयटीआय प्रवेशासाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेतयेत्या रविवारी कारगिल विजय दिवसाचे आयोजन“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” : महापौर रूपाराणी निकमकोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम: गगनबावाड्यात सर्वाधिक पाऊस, पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळीच्या खालीस्वराज्याचा हुंकार: लोकमान्य बाळ गंगाधर टिळकडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला 'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' दर्जास्व. अजितदादा पवार यांना गोकुळ तर्फे अभिवादन

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी हुबळीच्या ट्रस्टसमवेत सामंजस्य करार

schedule23 Jul 26 person by visibility 124 categoryशैक्षणिक

कोल्हापूर: विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला, रोजगार क्षमतेला आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठ, विद्यापीठाची सेक्शन-८ कंपनी एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि देशपांडे एज्युकेशनल ट्रस्ट, हुबळी (कर्नाटक) यांच्यात नुकताच त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास, पुनर्कौशल्य (Reskilling) आणि कौशल्यवर्धन (Upskilling) यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून देऊन त्यांची रोजगार क्षमता, व्यावसायिक क्षमता आणि करिअरसाठीची तयारी अधिक सक्षम करणे, हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे.

यावेळी देशपांडे एज्युकेशनल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एन. नायक म्हणाले, देशपांडे एज्युकेशनल ट्रस्टचा ‘देशपांडे स्किलिंग’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, त्याचे मुख्यालय हुबळी (कर्नाटक) येथे आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या संस्थेमार्फत उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. प्रामुख्याने आवश्यक व्यक्तिमत्त्व विकास व औद्योगिक कौशल्ये या अनुषंगाने विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. या करारानुसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातील.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले, या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार असून, विद्यापीठाच्या ‘कुशल, सक्षम आणि उद्योगसज्ज मनुष्यबळ निर्मिती’ या उद्दिष्टाला निश्चितच बळकटी मिळेल. विशेषतः ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या कामी हा करार महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

या सामंजस्य करारावर श्री. नायक आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी  प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, संचालक डॉ. सागर डेळेकर, रवी चव्हाण, एम. बी. शेख, रवी डोळी, डॉ. हेमराज यादव, सुभाष माने यांच्यासह तिन्ही संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes