SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शनविद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

जाहिरात

 

बीएचएमएस आणि सीसीएमपी पात्र डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार : मंत्री हसन मुश्रीफ

schedule23 Jul 26 person by visibility 413 categoryआरोग्य

मुंबई  : बीएचएमएस आणि सीसीएमपी पात्र डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेसंदर्भातील शासन निर्णय आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचे पालन करत नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

बीएचएमएस आणि सीसीएमपी पात्र डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रलंबित बाबींचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त अनिल भंडारी, आयुष संचालनालयाच्या संचालक सापळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी हेमंत पवार, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रतिनिधी, इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. अमोल आंबेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी मांडलेल्या सूचनांनुसार नोंदणी प्रक्रिया स्वतंत्र नोंदणी अभिलेखात करण्याबाबत तसेच बीएचएमएस, आणि सीसीएमपी. पात्र डॉक्टरांना कायद्यानुसार कोणत्या उपचारपद्धतींची परवानगी राहील, याबाबत स्पष्टता करण्यात आली. कायदेशीर बाबी, शासनाने वेळोवेळी यापूर्वी दिलेले निकष आणि लागू नियमांचा विचार करून नोंदणी प्रक्रियेची पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि नियमबद्ध करण्यासाठी मानक कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पात्र डॉक्टरांच्या नोंदणीबाबत कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. येत्या दोन दिवसांत तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर नियमितपणे सुरू करावी.संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय साधून नोंदणी प्रक्रिया अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes