यळगूडमध्ये अज्ञातांकडून एकाचा निघृण खून
schedule30 Aug 24 person by visibility 335 categoryगुन्हे
हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखाना पेट्रोल- पंपासमोरील टायर पंक्चर दुकानदार गिरीष पिल्लाई (वय ५०, सध्या रा. विशालनगर, हुपरी) यांचा अज्ञातांनी गुरुवारी रात्री त्यांच्या दुकानातच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याघटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे.
गिरीष पिल्लाई यांचे पेट्रोलपंपासमोरच टायर पंक्चर काढण्याचे दुकान आहे. गेल्या २५ वर्षांपासून त्यांचा येथे व्यवसाय आहे. रात्री दुकान बंद करून ते दुकानातच झोपले होते. त्यांच्या केरळमधील मूळ गावी वास्तव्यास असणारी त्यांची पत्नी रात्री साडेदहा वाजल्यापासून त्यांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होती. दहा-पंधरा वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न करून देखील संपर्क होत नव्हता त्यामुळे तिने कारखान्याचा कर्मचारी बबलू चव्हाण याला गिरीष फोन का घेत नाही? याबाबत दुकानाकडे जाऊन चौकशी करण्यास सांगितले.
बबलूने दुकानात जाऊन पाहिले असता दुकानाचे शटर बंद होते. शटर उघडून पाहिले असता गिरीष हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्याने ही माहिती पोलिसांना दिली.