गडमुडशिंगीमध्ये ७५ वडांच्या झाडांंचे नमो पार्क महाराष्ट्रातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम : सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार
schedule18 Sep 25 person by visibility 126 categoryराज्य

▪️वनविभागाच्या जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटल उभारण्यास सहकार्य करण्याची ग्वाही
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गडमुडशिंगी येथे वन विभाग, गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि भाजपच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वात पहिले ७५ वडाच्या झाडांचे नमो पार्क उभारण्यात आले आहे. वनविभागाच्या या जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटलची केलीली मागणी योग्य असून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. शासन स्तरावर किंवा मोठया उद्योगांच्या सीएसआर फंडातून हॉस्पिटल उभे केले जाईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले. गडमुडशिंगी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.
वनविभाग, गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि भाजपच्या वतीने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एक पेड मा के नाम हा उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत ७५ वडांचे वृक्ष लावून करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या वनविभागच्या जागेमध्ये नमो पार्क निर्माण केले आहे. या नमो पार्कचा शुभारंभ नामदार आशिष शेलार, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लावून करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त ऑक्सिजन देणार्या ७५ वटवृक्षाचे रोपण करण्यात आले.
भाजपच्या पदाधिकार्याच्या आईच्या नावाने हे झाड लावण्यात आले आहे. यासोबतच १७ सप्टेंबरपासुन अनेक लोकांखाभिमुख कार्यक्रम सूरू केले आहेत. संसद खेल महोत्सवा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले असून आत्तापर्यंत दहा हजार हुन अधिक खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. २ ऑक्टोबर पर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. तर वन विभागाच्या ठिकाणी एक सुसज्ज असे वन्य प्राण्यांसाठीचे हॉस्पिटल राज्य शासनाने सुरू करावे, अशी मागणी उपसरपंच तानाजी पाटील यांनी केली. दरम्यान गडमुडशिंगी मधील नमो पार्क हेे महाराष्ट्रातील ७५ वडाच्या झाडांचे पहिलेच नमो पार्क आहे. वनविभागाच्या जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटलची मागणी योग्य असून शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यास शासन स्तरावर किंवा सीएसआर फंडातून ते उभ करण्यात येईल. सेवा पंधरवडा म्हणून संपूर्ण देशभर उपक्रमांची रेलचेल सुरु आहे. या पंधरवड्यामध्ये कार्यकर्त्यांनी जनहिताचा सेवक म्हणून काम करावे. इथून पुढे प्रत्येक कोल्हापूर दौर्याच्या वेळेस इथल्या नमो पार्कला भेट देणार आहे, असे नामदार आशिष शेलार यांनी सांगितले. गडमुडशिंगी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने आणि हलगीच्या वादनात उपस्थितांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ किलोमीटर सायकल प्रवास करून पर्यावरण संदेश देणार्या जेष्ठ नागरिक पंडीत माळी यांचा नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, माजी सरपंच जितेंद्र यशवंत, माजी उपसरपंच अशोक दांगट, भाजपा प्रदेश सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, संग्रामसिंह कुपेकर, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, माधुरी नकाते, राजू माने, किरण घाटगे, आप्पासाहेब धनवडे, महेश चौगुले, चंद्रकांत नेरले, अनिल शिंदे, राजेंद्र सपकाळ, राहुल पाटील यांच्यासह ग्रीन मुडशिंगीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.