नीरज चोप्राला क्रीडाविश्वातील ‘ऑस्कर’साठी मिळाले नामांकन
schedule02 Feb 22 person by visibility 101 categoryक्रीडा
![](_smpnewsnetwork.com/u/pos/202202/Screenshot_20220202-182014_Chrome~2--800.jpg)
नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेला भालाफेकपटू नीरज चोप्राला क्रीडाविश्वातले ऑस्कर अशी ओळख असलेल्या ‘लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. हे नामांकन मिळवणारा नीरज तिसरा भारतीय ठरला.
नीरजने ऑलिम्पिकमध्ये अंतिम स्पर्धेत ८७.५८ मीटर भाला फेकत ट्रॅक अँड फील्डमध्ये देशासाठी पहिले पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू आहे.
यापूर्वी २०१९मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट आणि २०२२मध्ये सचिन तेंडुलकरला हे नामांकन मिळाले होते. सचिन लॉरियस क्रीडा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.