SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संधीकोंडीग्रे येथील आरोग्य शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणीपदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणगोकुळ निवडणुकीत मंत्र्यांच्या मुलाविरोधात सर्वसामान्य शेतकरीपुत्र मैदानात; शशिकांत खोतांचा जोरदार हुंकार!शिक्षकांच्या अन्यायाविरोधात रोष! पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने’चा बहिष्कारथकबाकीदारांना नोटिसा बजावून वसुली करा, अन्यथा मिळकतींवर बोजा नोंदवा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडरग्गेडियनच्या ‘रंगताली’ दांडिया-गरबा नाईटला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसादमहायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल; पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांचा विश्वासआंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिन: एक महत्त्वपूर्ण जागतिक मोहीम

जाहिरात

 

आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

schedule02 Oct 26 person by visibility 444 categoryसामाजिक

'मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेतील पास आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने पास काढण्याची आवश्यकता राहणार नसून, घरबसल्या ऑनलाइन पास मिळवता येणार आहे.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या ४ व ७ दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाइन पास काढताना प्रवाशांना आवश्यक माहिती भरल्यानंतर नियमानुसार पास उपलब्ध होणार आहे. प्रवाशाला प्राप्त झालेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये PDF स्वरूपात दाखवता येणार आहे. त्यामुळे पास खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे.

▪️QR कोड स्कॅन करून होणार तपासणी
ऑनलाइन पद्धतीने मिळालेल्या पासवर QR कोड देण्यात येणार आहे. प्रवासाच्या वेळी वाहकाकडील ईटीआयएम मशीनद्वारे हा QR कोड स्कॅन केला जाईल. QR कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार, पासची वैधता व इतर आवश्यक माहिती ईटीआयएम मशीनवर प्रदर्शित होणार आहे. तसेच प्रवाशाने दाखविलेल्या ओळखपत्राचीही पडताळणी करण्यात येणार असून, त्यानंतरच संबंधित प्रवाशाला प्रवासाची परवानगी दिली जाईल.

▪️आगारातील गर्दी कमी होणार
ऑनलाइन पास सुविधेमुळे प्रवाशांना आगारात रांगेत उभे राहण्याची गरज कमी होणार असून, विशेषतः सुट्टीच्या काळात आणि पर्यटनाच्या हंगामात पास काढणे अधिक सोपे होणार आहे. ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेचे डिजिटल रूपांतर करत एसटी महामंडळाने प्रवाशांच्या हातातच पासची सुविधा उपलब्ध करून दिल्याने एसटी प्रवास अधिक सुलभ, आधुनिक आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes