SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महात्मा गांधी जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने ‘स्वच्छता दिवस’ उत्साहात साजरामहात्मा गांधीजींचे विचारच नवतरुणांना प्रेरणा देत राहतील: डॉ. अजितकुमार पाटील - कसबा बावड्यात महात्मा गांधी जयंती व स्वच्छता दिन उत्साहात महापालिकेच्यावतीने माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी‘गाथा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची’ ग्रंथ भावी पिढ्यांच्या चारित्र्यनिर्मितीचा दीपस्तंभ : डॉ. माणिकराव साळुंखे यांचे प्रतिपादनसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘सीफोर स्कूल एक्सलन्स अवॉर्ड 2026' आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन: शांतता आणि मानवतेचा संदेशस्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोथळी, दानोळीत आरोग्य शिबिरआरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाचा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी घेतला आढावाकोल्हापूर : कळंबा साई मंदिर परिसरातील २५ हातगाड्यांवर महापालिकेची कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2K26' संपन्न; स्पर्धकांचा विक्रमी सहभाग

जाहिरात

 

महात्मा गांधीजींचे विचारच नवतरुणांना प्रेरणा देत राहतील: डॉ. अजितकुमार पाटील - कसबा बावड्यात महात्मा गांधी जयंती व स्वच्छता दिन उत्साहात

schedule02 Oct 26 person by visibility 167 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : प्राथमिक शिक्षण समिती, कोल्हापूर अंतर्गत मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि स्वच्छता दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय परिसर व क्रीडांगण स्वच्छ करून आणि क्रीडांगणावरील रोपांना पाणी घालून करण्यात आली. बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारे उपक्रम भारत स्काऊट गाईडच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांकडून सातत्याने केले जातात.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र शाळा मुख्याध्यापक  डॉ. अजितकुमार पाटील हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "सत्य, शिक्षण आणि संस्काराचा संगम म्हणजे महात्मा गांधीजी." तसेच "नेहमी खरे बोला, आई-वडिलांचे ऐका, सत्य हाच धर्म, अहिंसा परमो धर्म आणि स्वच्छता राखा" या पंचसूत्रीचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
शालेय संदर्भात धर्माचा खरा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणाले की, शाळेत धर्म म्हणजे नियम, स्वच्छता आणि प्रामाणिकपणा होय. एखादे मूल अभ्यास करत नसेल, तर त्याला समजावून सांगणे व त्याला वेळ देणे हीच खरी अहिंसा आहे. आपण सर्वांनी महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील 'स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय, साक्षर भारत आणि अहिंसक भारत' हे ध्येय कोल्हापूरच्या या छोट्या शाळेतून पूर्ण करूया. याशिवाय त्यांनी गांधीजींच्या भारत भ्रमणाविषयी अतिशय उपयुक्त माहिती दिली.

"स्वच्छ भारत, स्वच्छ कोल्हापूर, प्रदूषण मुक्त परिसर" या संकल्पनेवर आधारित इयत्ता ४ थी व ७ वीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे आणि प्लास्टिक वापरामुळे होणारे दुष्परिणाम दर्शवणारे प्रभावी पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमात पालक  अजित पवार यांनी गांधीजींच्या जीवनावरील सुंदर आणि प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांना दिली. महिला पालक सौ. शितल पाटील यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगत 'आपली शाळा, आपला वर्ग आपणच स्वच्छ ठेवूया' असे आवाहन केले. गांधी जयंतीनिमित्त विविध विद्यार्थ्यांनी स्फूर्तीदायी भाषणे देखील सादर केली.
याप्रसंगी शाळेच्या माजी विद्यार्थिनी  आरोही मोगरे,  हर्षदा दाभाडे आणि  किमया चौगले आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्तीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन  अमित पोटकुले सर यांनी मानले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, माजी विद्यार्थी  तुकाराम लाखे, मयूर रसाळ यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes