SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इचलकरंजी थरार: महासत्ता चौकातील फायरिंग प्रकरणातील दोन्ही आरोपींना २४ तासांत बेड्या!कोल्हापुरात लाचलुचपत विभागाचा मोठा धमाका! शिंगणापूरचा तलाठी आणि उपसरपंच ५ हजारांची लाच घेताना जाळ्यातपर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसटी20 वर्ल्ड कप सेमी फायनल : इंग्लंड विरुद्ध अटीतटीच्या लढतीत भारताचा थरारक विजय; आता फायनलमध्ये किवींचे आव्हान!जनगणना करताना कोणताही गट अथवा समूह जनगणनेपासून वंचित राहू नये : वीरेंद्र दीक्षितछत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचे आजरा येथे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात 20 मार्चपर्यंत बंदी आदेश लागूअंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफराज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी : प्रकाश आबिटकरछत्रपती शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हबला तत्वत: मान्यता

जाहिरात

 

टी20 वर्ल्ड कप सेमी फायनल : इंग्लंड विरुद्ध अटीतटीच्या लढतीत भारताचा थरारक विजय; आता फायनलमध्ये किवींचे आव्हान!

schedule05 Mar 26 person by visibility 101 categoryक्रीडा

मुंबई : संजू सॅमसनची वादळी फलंदाजी आणि शिवम दुबे-तिलक वर्मा यांच्या षटकारांच्या आतिषबाजीच्या जोरावर भारताने टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये  इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २५३ धावांचा डोंगर उभा करूनही जेकब बेथेलच्या शतकाने भारताच्या गोटात धडकी भरवली होती, मात्र टीम इंडियाने संयम राखत विजय खेचून आणला.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा (९) स्वस्तात बाद झाला. मात्र, संजू सॅमसनला मिळालेल्या जीवदानाचा त्याने पुरेपूर फायदा उठवला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने संजूचा साधा झेल सोडला आणि तिथूनच सामन्याचे चित्र पालटले. संजूने (८९) इंग्लंडच्या गोलंदाजांची कंबरडं मोडत मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. त्याला इशान किशनने (३९) चोख साथ दिली; या दोघांनी अवघ्या ४५ चेंडूत ९७ धावांची वादळी भागीदारी रचली.

मध्यफळीत शिवम दुबे (४३) आणि तिलक वर्मा (२१) यांनी 'पॉवर हिटिंग'चा नमुना सादर केला. संजू, इशान, दुबे आणि तिलक या चौघांनीही षटकारांची खैरात करत भारताला २० षटकांत ७ बाद २५३ या अवाढव्य धावसंख्येपर्यंत पोहोचवले. इंग्लंडच्या गोलंदाजांकडे भारतीय फलंदाजांच्या या आक्रमणाचे कोणतेही उत्तर नव्हते.


२५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जेकब बेथेलने एकाकी झुंज दिली. बेथेलच्या तडाखेबंद शतकामुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. मात्र, ठराविक अंतराने पडणाऱ्या विकेट्स आणि भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी दाखवलेला संयम यामुळे इंग्लंडला २० षटकांत ७ बाद २४६ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने ७ धावांनी हा सामना जिंकून फायनलचे तिकीट बुक केले.

 उपांत्य फेरीत इंग्लंडला धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघाचा सामना ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे. मायदेशात होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes