SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इचलकरंजी थरार: महासत्ता चौकातील फायरिंग प्रकरणातील दोन्ही आरोपींना २४ तासांत बेड्या!कोल्हापुरात लाचलुचपत विभागाचा मोठा धमाका! शिंगणापूरचा तलाठी आणि उपसरपंच ५ हजारांची लाच घेताना जाळ्यातपर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसटी20 वर्ल्ड कप सेमी फायनल : इंग्लंड विरुद्ध अटीतटीच्या लढतीत भारताचा थरारक विजय; आता फायनलमध्ये किवींचे आव्हान!जनगणना करताना कोणताही गट अथवा समूह जनगणनेपासून वंचित राहू नये : वीरेंद्र दीक्षितछत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचे आजरा येथे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात 20 मार्चपर्यंत बंदी आदेश लागूअंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफराज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी : प्रकाश आबिटकरछत्रपती शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हबला तत्वत: मान्यता

जाहिरात

 

कोल्हापुरात लाचलुचपत विभागाचा मोठा धमाका! शिंगणापूरचा तलाठी आणि उपसरपंच ५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

schedule05 Mar 26 person by visibility 119 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  आज एक मोठी कारवाई केली आहे. जमिनीच्या ७/१२ पत्रकावर वडिलांचे नाव लावण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणारा शिंगणापूरचा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) इरफान दिलावर सनदी आणि त्याला साथ देणारा उपसरपंच दीपक सदाशिव कांबळे या दोघांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.


तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ वर वडिलांचे नाव लावायचे होते. या कामासाठी तलाठी इरफान सनदी याने १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याप्रकरणी ४ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

आज ५ मार्च रोजी एसीबीच्या पथकाने शिंगणापूर तलाठी कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तलाठी सनदी याच्या सांगण्यावरून उपसरपंच दीपक कांबळे याने लाचेची ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली आणि ती टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवायला सांगितली. याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही झडप घालून ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यांच्या शिंगणापूर आणि कोल्हापूर येथील घरांच्या झडतीसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या दोघांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तपास पथक: ही कारवाई ला.प्र.वि. कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes