कोल्हापूर महानगरपालिका : कामावर वेळाने हजर झालेल्या 77 सफाई कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन व 2 आरोग्य निरिक्षक, 5 मुकादमांचे एक दिवसाचे वेतन कपात करुन कारणे दाखवा नोटीस
schedule23 Oct 24 person by visibility 1195 categoryमहानगरपालिका
▪️प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून सकाळी ताराराणी चौक येथील ई-3 आरोग्य स्वच्छता विभागाची तपासणी
कोल्हापूर : शहरातील कच-याच्या तक्रारी वाढत असल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी 6 वाजता ताराराणी चौक येथील ई-3 आरोग्य स्वच्छता विभागाची तपासणी केली. यावेळी या कार्यालयामध्ये मस्टरची तपासणी प्रशासकांनी केली. ही तपासणी करताना 6.30 नंतरही बरेचसे कर्मचारी येऊन पंचींग करत असलेचे आढळून आलेने या 67 सफाई कर्मचारी वेळाने आलेने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश प्रशासकांनी काढले आहेत.
मंगळवारीही प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सकाळी 6 वाजता शास्त्रीनगर येथील वर्कशॉपला अचानक भेट देऊन कचरा संकलन करणा-या 15 ॲटोटिप्पर चालकांचे एक दिवसाचे वेतन कपात केले आहे.
यानंतर प्रशासकांनी कावळा नाका, ताराबाईपार्क, व्हिनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, विचारेमाळ, सदरबाजार या भागामध्ये आरोग्य निरिक्षक व मुकादम यांचे समवे फिरती केली. या फिरती दरम्यान भागामध्ये स्वच्छतेचे काम समाधानकारण नसलेने व कच-याचे ढिग आढळून आलेने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
त्याबरोबर अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांना सकाळी 6.30 वाजता शास्त्रीनगर येथील वर्कशॉप येथे तपासणी केली असता 3 ॲटो टिप्पर ड्रायव्हर वेळाने आलेने त्यांचे व शहरात फिरती करताना 10 कर्मचारी पंचींग करुन प्रत्यक्षात प्रभागात कामावर हजर नसलेचे निदर्शनास आलेने या 10 सफाई कर्मचा-यांचे व 2 आरोग्य निरिक्षक, मुकादम यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले.
शहरामध्ये स्वच्छतेबाबत ब-याच तक्रारी नागरीकांच्या येत असल्याने नियंत्रण अधिकारी अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्त क्र.1, 2 व सहा.आयुक्त क्र.2, 3 यांनी त्यांच्या विभागीय कार्यालय क्षेत्रात वेळोवेळी फिरती करुन स्वच्छतेचे कामावर नियंत्रण न ठेवलेने, वेळोवेळी फिरती न केलेने त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे.