SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अग्निवीर भरती २०२६ साठी १ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी सुरूसामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडीलोकशाही दिनी १२२ तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशराजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक : आमदार राजेश क्षीरसागरअथर्व शिंदे, तन्वी पाटील ठरले डी. वाय.पॉलिटेक्निकचे बेस्ट आउटगोइंग स्टुडंट्सस्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणादिनी महापालिका पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी दानशिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना श्रद्धांजलीहोलिका दहन: असत्यावर सत्याच्या विजयाचा जाज्वल्य उत्सव!वरिष्ठ जैन आचार्य कीर्तीयश सुरीश्वरजी यांचे विश्वशांती अष्टान्हिका महोत्सवासाठी कोल्हापुरात आगमनभाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जल्लोषी स्वागत

जाहिरात

 

अग्निवीर भरती २०२६ साठी १ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी सुरू

schedule02 Mar 26 person by visibility 69 categoryराज्य

कोल्हापूर : अग्निवीर जनरल ड्युटीसाठी भारतीय सैन्य भरतीची ऑनलाइन नोंदणी १३ फेब्रुवारी २०२६ ते १ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू झाली आहे. अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (८ वी) व अग्निवीर ट्रेड्समन (१० वी) या पदांसाठी अर्ज Indian Army च्या अधिकृत संकेतस्थळावर www.joinindianarmy.nic.in वर उपलब्ध आहेत.

ही नोंदणी महाराष्ट्र राज्यातील सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील तसेच गोवा राज्यातील उत्तर गोवा व दक्षिण गोवा येथील उमेदवारांसाठी लागू आहे. नोंदणी प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी Join Indian Army या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 लष्कराच्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांनी कोणत्याही दलालांना बळी पडू नये, कारण भरती प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष व पारदर्शक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी कोल्हापूर येथील आर्मी रिक्रूटिंग ऑफिसशी दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६०६४१९ वर संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes