डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन
schedule17 Jan 25 person by visibility 295 categoryक्रीडा
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तंत्रनिकेतनला यावर्षी ' इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन ' (बी 1 झोन) यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या विभागीय स्तरावरील बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्याचा बहुमान प्राप्त झाला. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , सातारा जिल्ह्यातील विविध डिप्लोमा कॉलेजेस मधील गुणवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये वैयक्तिक आणि सांघिक प्रकारामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतील.
असोसिएशन तर्फे दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. डिप्लोमा इंजीनियरिंग स्तरावरील ही अत्यंत प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा असून खेळाडूंमध्ये या स्पर्धेची प्रचंड उत्सुकता असते. सोमवार, दिनांक 20 जानेवारी रोजी बॅडमिंटन आणि 21 जानेवारी , 2025 रोजी टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे केले असून मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेचे व्यवस्थापक अमित आवाड, क्रीडाप्रमुख ऋषिकेश मेथे, क्रीडा समन्वयक प्रा. साजिद नाईक, प्रा. बळीराम पाटील स्पर्धेच्या उत्तम नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. बॅडमिंटन आणि टेबल टेनिस क्षेत्रातील अनुभवी पंचांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी विभागीय स्तरावरील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संचालनासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्रा. शुभांगी गावडे, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.