SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेकोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’; ३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरणदीड वर्षांपासून रखडले काम; उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यासाठी शिवसेना मैदानात!महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्रडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजन

जाहिरात

 

'पालकत्वाचा लढा होईल सोपा; पद्माराजे हायस्कूलचा मदतीचा हात!'

schedule14 Mar 26 person by visibility 356 categoryशैक्षणिक

◼️एकल महिला पालक मेळावा उत्साहात

कोल्हापूर  : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज व साऊ एकल महिला समिती, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा पालक मेळावा संपन्न झाला. ज्या विद्यार्थिनींचे पालक एकल महिला आहेत किवा एकल पुरुष म्हणजेच आई नाही पण वडील आहेत, किंवा कायदेशीर घटस्फोटित , किंवा कायदेशीर घटस्फोट नसलेले(परितक्त्या)  किंवा अविवाहित अशा सर्व 5 वी ते 10 वी च्या पालकांसाठी गुरुवार दिनांक 12/03/2026 रोजी सकाळी 10.00  वाजता राम गणेश गडकरी हॉल मध्ये एकल महिला/ पुरुष पालक मेळावा संपन्न झाला.

 एकल महिला पालक योजना किंवा विधवा महिला योजना या संदर्भात महिला व बाल कल्याण विकास मंडळ यांच्या वतीने लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती अधिकारी  महेन्द्र कांबळे  यांनी अगदी विस्तृतपणे  सांगितली. तसेच रोटरी क्लब ऑफ हेरिटेज यांच्या वतीने डॉ. योगिता गुळवणी यांनी स्व-जागरूकता, स्व-सक्षमीकरण आणि ताण व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. 

  प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता पाटील यांनी प्रास्ताविकातून एकल महिला पालक यांना जर समस्या आल्या मग त्या समस्या कायदेशीर असोत, आर्थिक असोत किंवा मुलांच्या शिक्षणाबाबतच्या असोत; या सर्व प्रश्नांवर तज्ज्ञांच्या मदतीने प्रकाश टाकणे हा आमचा मुख्य हेतू आहे असे सांगितले. साऊ एकल महिला समितीच्या कोल्हापूर जिल्हा समन्वयक व कार्यक्रमाच्या अध्यक्षा  सुरेखा राजेशिर्के यांनी एकल महिलांचे आजपर्यंत प्रश्न जशा पद्धतीने सोडवले ते अनुभव कथन केले. आभार रोटेरीयन डॉ. ज्योती ओस्वाल यांनी मानले. या मेळाव्यास प्रेसिडेंट रोटेरीयन पूजा गांधी, सचिव रोटेरीयन श्रुती मंत्री व रोटेरीयन राखी परमार उपस्थित होत्या.

 सूत्रसंचालन  मृणाल कुलकर्णी यांनी केले. प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल या प्रशालेच्या पालकांनी असा मेळावा शाळेच्या वतीने आयोजित केल्याबद्दल खूप समाधान व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes