+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustलोकसभा निवडणूक 2024 : गुरुवारी कोल्हापूरसाठी 12 उमेदवारांनी 16 तर हातकणंगलेसाठी 14 उमेदवारांनी 17 नामनिर्देशनपत्रे केली दाखल adjustयशवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ उत्साहात adjustघरफाळा विभागाच्यावतीने 1 लाख 58 हजार 500 बिले जनरेट adjustभारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ adjustलोकसभा निवडणूक 2024 : माढ्यातील उमेदवाराची अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरुन एन्ट्री adjustघोडावत विद्यापीठातील कॉमर्स व मॅनॅजमेण्ट विभागाच्या ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustपरगावी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी 7 मे रोजी मतदानासाठी येण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांचे आवाहन adjustदुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे; कुशिरे येथे दूध उत्पादकांना जातिवंत म्हैशी प्रदान करण्याचा कार्यक्रम adjustआरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustकोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, हातकणंगलेत परिसरात जोरदार पाऊस
Photo_1712720584815~2
Photo_1711784304922~2
SMP_news_Gokul_ghee
schedule12 Jan 23 person by visibility 1317 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शिंगणापूर अशुध्द  जल उपसा केंद्राकडील  एक पंप नादुरूस्त झालेने शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणा-या भागास  पंप दुरूस्त होईपर्यत पुरेशा दाबाने  पाणी  पुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे  पुईखडी  जलशुध्दीकरण केंद्रातून ई वॉर्ड व सलग्नीत उपनगरांना  होणारा पाणी पुरवठा शनिवार, दि.14 जानेवारी 2023 पासून एक दिवस आड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ए , बी वॉर्ड व सलग्नीत उपनगरांना रविवार दि.15 जानेवारी 2023 रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. याप्रमाणे पंप दुरूस्त होऊन कार्यान्वित होईपर्यंत एक दिवस आड दि.30 जानेवारी 2023 पर्यंत  पाणी पुरवठयाचे  नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये ई वॉर्डास व संपूर्ण राजारामपुरी  1 ली ते 13 वी  गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेंशन, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीनपार्क, शाहुपूरी 1 ली ते 4 थी गल्ली, व्यापारपेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत,  लोणार वसाहत,  लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत इत्यादी भागात शनिवार दि. 14 जानेवारी 2023 रोजी पासून  एक दिवस  आड पाणी पुरवठयाचे नियोजन जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित होईपर्यंत करण्यात आले आहे.  

त्याचबरोबर ए, बी, वॉर्ड त्यास  सलग्नित उपनगरे भाग व  शहराअंतर्गत येणा-या संपूर्ण फुलेवाडी  रिंगरोड,  सानेगुरूजी  वसाहत, राजेसंभाजी, क्रशरचौक, आपटेनगर टाकी परिसर,  राजोपाध्येनगर, कणेरकरनगर,  जरगनगर,  क्रांतीसिंहनाना  पाटील  नगर, तुळजाभवानी  कॉलनी,  देवकर पाणंद, शिवाजी पेठ, चंद्रेश्वरगल्ली,  तटाकडील  तालीम, साकोली कॉर्नर,  उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, संपूर्ण मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, सुभाषनगर पंपींगवरील अवलंबून असणारा परिसर, शेंडापार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, वाय पी पोवार नगर, मिरजकर तिकटी इत्यादी भागामध्ये शनिवार दि. 14 जानेवारी 2023 रोजी  पासून एक दिवस आड पाणी पुरवठयाचे नियोजन जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित होईपर्यंत करण्यात आले आहे.  तरी शहरातील नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.