SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारतीय जनता युवा मोर्चाच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात कोल्हापूर : लीशा हॉटेल ते कदमवाडी रस्त्यावरील अनधिकृत पत्रा शेडवर महापालिकेची कारवाईआमदार यड्रावकर यांच्या हस्ते कवठेसार व कोथळीत ८८.२८ लाख रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात मंगळवारी 'कै. रामचंद्र कबनूरकर स्मृती' भव्य खुली एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धासंजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. रविंद्र धोंगडी यांना ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड’ने सन्मानितज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर आणि युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखे यांना यंदाचा पहिलाच 'गुणीदास पुरस्कार २०२६ ' जाहीर, ६ डिसेंबर रोजी होणार पुरस्काराचे वितरणआंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन: ज्ञान, संघर्ष आणि परिवर्तनाचा संदेशकोल्हापुरात 'महा-पल्स एआय' प्रकल्पाचा शुभारंभशिरोली-किणी या मार्गावरील अपघातांचे ऑडिट करण्यात यावे : अपर जिल्हाधिकारी अजय पवारप्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

जाहिरात

 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

schedule17 Nov 26 person by visibility 117 categoryसामाजिक

▪️नाथाजी पाटील यांच्या हस्ते विजेत्या मंडळांचा गौरव; छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम कौतुकास्पद

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, कोल्हापूरच्या वतीने युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्या मंडळांचा बक्षीस वितरण समारंभ काल भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष  नाथाजी पाटील यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विजेता तरुण मंडळ, रमणमळा, कसबा बावडा यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक हिंदवी ग्रुप, विचारे मळा, तर तृतीय क्रमांक संध्यामठ तरुण मंडळ यांनी मिळविला. विजेत्या मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, स्वराज्याची प्रेरणा आणि महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा गौरवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, तसेच तरुणांमध्ये इतिहासाविषयी अभिमान आणि दुर्गसंवर्धनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
सहभागी मंडळांनी आकर्षक आणि ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, जयेश पाटील घरपणकर, तलहा मणेर, अनिकेत मुतगी, अनिरुद्ध भुरके, अनिकेत सोलापुरे, इंद्रजीत कवाळे, ओंकार गोसावी, अमित शिंदे, पृथ्वीराज पुरोहित, शिवम बुचडे, देवयानी पाटील यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहभागी मंडळांचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आभार मानण्यात आले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास आणि स्वराज्याची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes