कोरे अभियांत्रिकीचे प्राध्यापक संजय सुतार यांना पी.एच.डी. पदवी प्रदान
schedule09 Dec 24 person by visibility 287 categoryशैक्षणिक
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालयाचे मेकॅनिकल विभागातील प्राध्यापक संजय सुरेश सुतार यांनी पी.एच.डी. पदवी प्रदान झाली आहे.
प्रा. संजय सुतार हे मेकॅनिकल विभागातील अनुभवी प्राध्यापक असून, त्यांनी " न्यूमरिकल अँड एक्सपिरिमेंटल स्ट्रेस अनॅलिसिस ऑफ स्पर गिअर्स फॉर वेट रिडक्शन युजिंग रेडियल होल्स " या विषयावर संशोधनपर प्रबंध सादर केला. प्रा.संजय सुतार यांनी भारतातील प्रमुख संशोधन संस्थांपैकी एक, प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटक (NITK) सूरथकल येथे त्यांचे संशोधन केले.
या संशोधनासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपल्या संशोधनाचा उपयोग समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी करावा असा सल्ला डॉ. विनय कोरे यांनी दिला. अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने, विभाग प्रमुख, डॉ. पी. व्ही. मुळीक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.