SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा ; आणखीन ५o कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर राष्ट्रवादी भवन येथे ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात; २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजलीनिधीअभावी बंद पडलेले 'आपला दवाखाने' तात्काळ सुरू करा; अन्यथा आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवूखेबवडेतील बुद्ध विहार पाणवट्याचा प्रश्न मार्गी; सागर भोगम यांनी दिलेला शब्द पाळला!लोकशाहीचा प्राणवायू: भारतीय संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेबांचा अमूल्य वारसामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे महापौर रूपाराणी निकम यांचे निवेदनशिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ २७ नोव्हेंबरला; तनुजा साळोखे यांना राष्ट्रपती, तर वेदिका कदम यांना कुलपती सुवर्णपदककोल्हापूर महानगरपालिका : चालू आर्थिक वर्षात घरफाळा व पाणीपट्टीसाठी अभय योजना लागू करण्याचा कोणताही विचार प्रशासनाचा नाही- आयुक्त डॉ.राजेंद्र भारूडघोसरवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २१४ नागरिकांची तपासणीसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे चालु गळीत हंगामाचे रू. ३९०० प्रमाणे उसबिल जमा : अध्यक्ष नवीद मुश्रीफ

जाहिरात

 

शिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा ; आणखीन ५o कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर

schedule26 Nov 26 person by visibility 120 categoryसामाजिक

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी हक्काचे आणि अत्याधुनिक क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. शिरोळ शहरातील गट नंबर ८९९ मधील सात एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या शिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर उर्वरित ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबई मंत्रालय येथे झालेल्या बैठकीत या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील क्रीडा प्रेमींनी पाहिलेले क्रीडा संकुलाचे स्वप्न आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पूर्ण केले आहे.

शिरोळ तालुक्यात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत खेळाडू आहेत. अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर शिरोळ तालुक्याचे नाव लौकिक करीत आहेत. मात्र, त्यांना सरावासाठी आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेले हक्काचे क्रीडा संकुल उपलब्ध व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ही गरज ओळखून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ शहरातील गट नंबर ८९९ मधील सात एकर जागा तालुका क्रीडा संकुलासाठी राखीव ठेवली.

 तालुक्यातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, नवोदित खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि सुविधा मिळाव्यात तसेच शिरोळ तालुक्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय - आंतराराष्ट्रीय पातळीवर तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला होता.

या क्रीडा संकुलासाठी आमदार यड्रावकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाकडे ५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील पाच कोटी रुपयांच्या निधीला आता मंजुरी मिळाली आहे. उर्वरित ५० कोटी रुपयांचा निधी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर व्हावा, यासाठी प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यातील पाच कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलामध्ये इनडोअर हॉल, मल्टीपर्पज हॉल, व्हॉलिबॉल, खो-खो आणि कबड्डीसाठी स्वतंत्र मैदाने तसेच पाण्याची व्यवस्था यांसह विविध मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामुळे तालुक्यातील खेळाडूंना एकाच ठिकाणी विविध खेळांचा सराव करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

तर प्रस्तावित उर्वरित ५० कोटी रुपयांच्या निधीतून तीन मजली कुस्ती संकुल, खेळाडूंसाठी वसतिगृह, संरक्षक कंपाउंड, शॉपिंग गाळे, दोन बास्केटबॉल मैदाने, स्केटिंग मैदान आणि मल्टीपर्पज हॉल अशा अत्याधुनिक सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे हे संकुल केवळ क्रीडांगण न राहता तालुक्यातील खेळाडूंच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र ठरणार आहे.

शिरोळ तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes